Bachelor Party: अलीकडे अनेक लग्नसोहळ्यांमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचे दर्शन घडते. पश्चिमेकडील देशात लग्न सोहळा हा अगदी तासाभराचा असला तरी त्याआधीचे काही सेलिब्रेशन हे खास असतात. भारतात सुद्धा हळूहळू रुजलेली अशीच एक संकल्पना म्हणजे बॅचलर पार्टी. सिंगल म्हणून जगण्याचा एक शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी नवरा किंवा नवरीचे जवळचे मित्र अशी बॅचलर पार्टी आयोजित करतात. तसा हा वादाचा मुद्दा असला तरी एक गमतीचा भाग म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. असाच एक बॅचलर पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. पण याचे वेगळेपण म्हणजे लग्नाआधी नव्हे तर नवऱ्याच्या मित्रांनी भरमंडपात लग्न लावलेल्या स्टेजवरच बॅचलर पार्टी सुरु केली आहे. यावेळी एक सिंगर महिला अचानक स्टेजवर येऊन नवऱ्यासह फ्लर्ट करत नाचू लागते आणि मग हे बघून नवरीची जी प्रतिक्रिया होती ती आपण व्हिडिओमध्येच पाहा.
आपण पाहू शकता की या व्हिडिओमध्ये नवरा नवरी लग्नाच्या स्टेजवर बसले आहेत. अचानक एक सिंगर तिथे येऊन नाचू लागते. नवविवाहित जोडप्यासाठी गाणी गाऊ लागते. अगदी जमिनीवर लोळून जेव्हा ही महिला गाऊ- नाचू लागते तेव्हा मात्र नवरीच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. पुढे काही सेकंद ही महिला नवरीच्या समोरच नवऱ्यासह नाचत असते. शेवटी नवरा स्वतःच घाबरून आपल्या पत्नीच्या बाजूला येऊन बसतो पण यावेळी चिडण्यापेक्षा ही नवरी सुद्धा खेळकरपणे हसत लाजताना दिसत आहे.
VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हे ही वाचा<< ISRO प्रमुख एस.सोमनाथ यांचा डान्स रेकॉर्ड करणाऱ्याने सांगितली खरी बाजू! चांद्रयान ३ नंतर प्रचंड व्हायरल झाले पण…
दरम्यान, हा व्हिडीओ भारतातील आहे असे वाटत नाही. अनेकांनी यावर कमेंट करून नवऱ्याच्या मित्रांचा त्याला अडकवण्याचाच प्लॅन होता असे म्हटले आहे. तर काहींनी हसऱ्या नवरीच्या खेळकरपणाचे कौतुक केले आहे. काहींनी तर या जागी आपली गर्लफ्रेंड किंवा बायको असती तर तिने दोघानांही स्वर्गच दाखवला असते असेही म्हटले आहे. हा सगळा गमतीत केलेला एक प्रॅन्क होता.
