Maharashtra October 2025 Bank Holiday List: ऑक्टोबर देशभरात अनेक बँकांना सुट्ट्या असतील. गांधी जयंती ते दसरा, दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत अशा अनेक महत्त्वाच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांचे सुट्टीचे अधिकृत कॅलेंडर जारी केले आहे. यामध्ये याबाबातची यादी देण्यात आली आहे. ऑनलाइन बँकिंग, मोबाइल अॅप्स आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. मात्र, प्रत्यक्ष बँका या दिवसांत बंद असतील. ज्यांना प्रत्यक्ष बँकिंग सेवेची आवश्यकता आहे, त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

२ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती

२ ऑक्टोबर २०२५, गुरूवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी आहे. या दिवशी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँका बंद राहतील. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील दोन्ही बँका या दिवशी बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांना डिजिटल बँकिंग किंवा एटीएमवर अवलंबून राहावे लागेल.

दसरा, दिवाळी आणि छठ पूजा

गांधी जयंतीव्यतिरिक्त दसरा, दिवाळी आणि छठ पूजा या दिवशीही अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी असल्याने ती राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी असेल.

दिवाळी- २० ते २२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत छोटी दिवाळी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तसंच भाऊबीज या सणांच्या दिवशी बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

छठ पूजा- बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात २७ आणि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी बँका बंद राहतील.

या सणांच्या तारखांना बँका प्रत्यक्ष बंद असल्या, तरी ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू असतील. ग्राहक कोणत्याही अडचणीशिवाय पेमेंट करू शकतात, पैसे ट्रान्सफर करू शकतात आणि एटीएम वापरू शकतात. असं असताना जर तुम्हाला रोख रक्कम जमा करायची असेल, चेक क्लिअरन्स असेल किंवा कर्जाशी संबंधित काम असेल तर अशा सेवासंदर्भातील कामं सुट्टीआधीच उरकून घ्यावीत. सणांच्या या दिवसांनंतर तुमच्या आर्थिक कामांचं नियोजन केल्यास ऐन वेळेला घोटाळा होणार नाही.

२९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर बँकांना सुट्टी आहे का?

अश्विन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाचा आज, २९ सप्टेंबर सातवा दिवस असलेल्या दिवशी आगरतळा, कोलकाता आणि गुवाहाटीसाठी आरबीआयने सुट्टी जाहीर केली आहे.

३० सप्टेंबर रोजी महाअष्टमीमुळे आगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ, जयपूर, कोलकाता, पटना आणि रांचीसह अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.

१ ऑक्टोबर रोजी आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इटानगर, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग आणि तिरूअनंतपुरम यांसह अनेक शहरांमध्ये नवरात्रीतील नवमीनिमित्त बँका बंद राहतील.

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.

३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजेसाठी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.

५ ऑक्टोबर रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका संपूर्ण भारतात बंद राहतील.