Viral video: सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हारल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण चांगलेच थक्क होऊन जातो. म्हाताऱ्या आजोबांचे काही व्हिडीओ तर आपल्याला अचंबित करुन जातात. सध्या अशाच एका अजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा गाणं गात आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. एक म्हातारे आजोबा आपल्या मधुर आवाजात १९७६ च्या राजेश खन्ना आणि हेमा मालिनीच्या फिल्म ‘महबूबा’ मधील फेमस गाणं ‘मेरे नैना सावन भादो’ गात आहे.

व्हिडिओमध्ये एक बाबा दिसत आहेत, ज्यांनी एक कुर्ता घातला आहे आणि तो अगदीच मळलेला दिसत आहे. त्यांच्या हातात एक लाठी आहे आणि ते गाणं गाताना दिसत आहेत आणि त्याच्या हातात काही नाणी देखील आहेत. पण त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका, त्यांचा आवाज एखाद्या मोठ्या सिंगरला ही लाजवेल असा आहे.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अप्रतिम आहे. कोणामध्ये काय प्रतिभा दडलेली आहे, हे सांगता येत नाही असं म्हणतात. आपल्या देशात तर प्रत्येक माणसामध्ये एखादीतरी कला दडलेली आहेच. सध्या व्हायरल होत असलेले आजोबांचा आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.विशेष म्हणजे ते गात असताना बाकीचे लोक आवडीने शातंपणे ऐकत आहेत. काही लोक मध्येच दाद देताना दिसतायत. विशेष म्हणजे गाणं गाताना ते कुठेही अडथळत नाहीयेत. त्यांची हीच खाशियत लोकांना आवडली आहे.

पाह व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ alwar_wala_1011 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला आहे. तर काही लोकांनी आश्चर्यकारक अशा कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “सगळे आजोबांविषयी चांगले बोलले, पण त्यामुळे काहीही होणार नाही. शक्य असेल तर त्यांना मदत करा.” तर दुसऱ्यानं “आजोबांच्या आवाजात किती गोडवा आणि वेदना आहे.” तर आणखी एकानं, “आजोबा, तुम्ही गायकालाही फेल केले आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.