बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 च्या उद्घाटनाला काही दिवस शिल्लक असताना सध्या सोशल मीडियावर त्याचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. या व्हिडीओमध्ये अगदी विदेशातल्या लक्झरी हॉटेलसारखं चकाकणारं विमानतळ पाहून लोक आश्चर्य होऊ लागले आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला हे विदेशातलं विमानतळ असल्याचा भास होतो. पण हे विमानतळ कोणत्या विदेशातलं नसून आपल्या भारतातलंच आहे, हे कळाल्यानंतर लोक आश्चर्याने हा व्हिडीओ पाहू लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 ची काही फिचर्स दाखवण्यात आली आहेत. बंगळुरू शहराची गार्डन सिटी ही ओळख दर्शवण्यासाठी या विमानतळाच्या टर्मिनलला गार्डनसारखा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याचे उद्घाटन येत्या ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याचा व्हिडीओ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री के सुधाकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या हस्ते उद्घाटन होणार असलेल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुंदर टर्मिनल-2 वर एक नजर टाकुया.. गार्डन टर्मिनल म्हणून सजवलेले…टर्मिनल -2 हे गार्डन सिटी म्हणून नम्मा बंगळुरू शहराची ओळख व्हावी या उद्देशाने डिझाईन केले गेले आहे,” असे ट्विटमध्ये सांगितले आहे.

आणखी वाचा : खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोमध्ये घुसण्यासाठी माणसाने काय शक्कल लढवली, पाहा हा VIRAL VIDEO

उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी तोच व्हिडीओ पुन्ही रिट्विट केला. “टर्मिनलने बंगळुरूची ओळख गार्डन सिटी म्हणून कॅप्चर केले आणि टर्मिनल “मास्टरपीस पेक्षा कमी नाही” असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

आणखी वाचा : भांडता भांडता एस्केलेटरवरून पडले तरीही लाथा-बुक्क्या सुरूच! पाहा हा मजेदार VIRAL VIDEO

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की “गार्डन टर्मिनलची रचना बंगळुरूची हिरवी ओळख पुनरुज्जीवित करण्यासाठी केली गेली आहे” आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हिरवेगार विमानतळ उभारल्याबाबत विमानतळ प्राधिकरणाचे कौतुक केले.

विमानतळाचे टर्मिनल २ दोन टप्प्यात तयार होत आहे, पहिल्या टप्प्यात विमानतळाची क्षमता दरवर्षी २५ दशलक्ष प्रवाशांनी वाढवणे अपेक्षित आहे. टर्मिनलच्या पहिल्या टप्प्याची किंमत सुमारे १३,००० कोटी रुपये आहे आणि ते २५५,००० चौरस मीटर क्षेत्रफळात तयार होईल. टर्मिनलचा दुसरा टप्पा अद्याप नियोजनाच्या टप्प्यात आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कोमोडो ड्रॅगनने कासवाची केली शिकार, त्याचे कवच टोपीसारखं घालून फिरू लागला

टर्मिनल मार्च २०२१ मध्ये उद्घाटनासाठी खुले होण्याची अपेक्षा असतानाही, करोना व्हायरस साथीच्या आजारामुळे विमानतळावरील बांधकामाच्या कामांना विलंब झाला होता.