बिहारमध्ये दारूवर बंदी असली तरीही तेथील अनेक लोक दारूच्या नशेत फिरताना तर कधी भांडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर दारू तस्करांच्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सर्वप्रकारच्या युक्त्या अवलंबून ते दारूची तस्करी करताना दिसत आहेत. सध्या अशाच एका दारु तस्करीचा विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कारची सीट कापून आतमध्ये दारुच्या बाटल्या ठेवल्याचं दिसत आहे.

कारच्या सीटमध्ये लपवली दारू –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका कारची सीट उघडल्यानंतर आतमध्ये दारुच्या बाटल्या ठेवण्यासाठी एक कप्पा केल्याचं आढळून आलं. शिवाय सीटच्या खालची जागा दारूच्या बाटल्यांनी भरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिहारमधील छपरा येथील असल्याचं सांगितलं जात आहे. कुलूप असलेल्या कारच्या सीटला एक दरवाजा करण्यात आला होता. सीटमध्ये दारूच्या बाटल्यांमध्ये भरल्यानंतर त्या दरवाजाला कुलूप लावण्यात आलं होतं. दारुच्या बाटल्या लपवण्यासाठी खूप जुगाड केला तरीही दारु तस्कर पोलिसांना ही तस्करी थांबण्यात यश आलं आहे.

हेही पाहा- कोर्टात सुनावणी सुरू असताना महिलेने न्यायाधिशांसमोरच केला नागिन डान्स, व्हायरल VIDEO पाहून डोकंच धराल

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

धक्कादायक बाब म्हणजे इंधनाच्या टाकीतही दारूच्या बाटल्या ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हनिश अरोरा नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिलं, “जेव्हा संपूर्ण देश दारू पीत आहे, तेव्हा बिहारला वंचित का ठेवले जात आहे?” केशव झा यांनी लिहिलं, “माननीय नितीश कुमार यांचे आभार मानायला हवे की त्यांनी समाजाला एवढा सृजनशील बनवले की त्यांनी दारूबंदी लादून तेथील लोकांना जुगाडच्या बाबतीत बिहारला नंबर वन केले आहे.”

प्रियांशू कुमार यांनी लिहिलं, “दारू बंदी निरुपयोगी आहे, यामुळे बिहारचे लाखोंचे नुकसान होत आहे, हजारो चेकपोस्ट विनाकारण बनवण्यात आल्या आहेत, हजारो सैनिक फक्त दारू पकडण्यात गुंतले आहेत, लाखोंच्या मशीन्स वाया गेल्या आहेत, जर. हा सगळा पैसा बिहारच्या विकासासाठी वापरला गेला, बिहार कुठल्या कुठे पोहोचला असेल?” दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एका व्यक्तीने बाईकमध्ये पेट्रोलची वेगळी टाकी बनवली होती, ज्याद्वारे तो दारूची तस्करी करत होता. या बाईकस्वाराला पकडण्यात यश आलं आहे. मात्र, कारमधील प्रवासी फारार झाले आहेत. तर ही दारू उत्तर प्रदेशातून बिहारमध्ये आणली जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.