Viral video: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. वाहतुकीचे नियम पाळा, अतिघाई करु नका. स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करा अशा सुचना आपण ऐकत असतो मात्र काही महाभाग काहीही झालं तरी ऐकत नाहीत.सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. अशातच तुम्ही आतापर्यंत तरुणांना चालत्या बाईकवर स्टंटबाजी करताना पाहिलं असेल मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की डोक्याला हा लावाल. कारण या व्हिडीओमध्ये चक्क एक काका चालत्या बाईकवर स्टंटबाजी करतोय. त्यानं भरधाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपल्या चालत्या बाईकवर दोन्ही हात सोडून बसला आहे. बरं याची बसायची पद्धतही खतरनाक आहे. तो बाईकच्या एका बाजुला दोन्ही हात सोडून चक्क हाताची घडी घालून बसले आहेत. मध्येच ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवत आहेत. हे इतकं भयंकर आहे की बघतानाही अंगावर काटा येतो. त्यामुळे काकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. यावेळी अपघात, दुर्घटना होण्याची भीती आहे मात्र हे काका बिंधास्त वाहतुकीचे नियम तोडून सर्रास स्टंटबाजी करत आहेत. थोडाजरी तोल गेला तरी काकांचा मोठा अपघात होऊ शकतो.

गाडी कोण चालवतंय? हे काय सुरू आहे? असे प्रश्न एक व्यक्ती दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीला विचारत आहे. त्यावर ही गाडी रामभरोसे चालली आहे, असं उत्तर या व्यक्तीने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आई कधीच गरीब नसते” रस्त्याच्या कडेला बसलेल्या माय-लेकाचा व्हायरल VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

काकांना या वयात असे स्टंट करताना पाहून बहुतेक युजर्स फनी प्रतिक्रिया देत आहेत. या वयात पडले तर हाडेही जुळणार नाहीत, असे एका यूजरने लिहीले आहे. त्याचवेळी, एका यूजरने या वयात असे अप्रतिम स्टंट करणार्‍या व्यक्तीचे कौतुक केले आहे आणि या वयात असे स्टंट करणे ही स्वतःमध्ये मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike stunt viral video two wheeler run on highway without driver shocking video srk