असे अनेक लोक आहेत जे चांगले शिक्षण घेतल्यानंतर इतर व्यवसाय सुरु करतात. काहीजण तर चहाचा स्टॉलही सुरु करतात. सध्या असाच एक चहा विक्रेता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या तरुणाने आपल्या व्यवसायाशी निगडित अनेक नवे प्रयोग करून पाहिले आहेत. पण त्याने केलेल्या नव्या प्रयोगाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूचा चहा स्टॉल मालक आणि त्याचे दुकान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे चहासाठी सामान्य पैशाऐवजी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेतले जातात. ही चहाची टपरी चालवणाऱ्या तरुणाचं नाव शुभम सैनी असे असून त्याच्या स्टॉलचे नाव ही ‘फ्रस्टरेटेड ड्रॉपआउट’ असे आहे. या स्टेलचे नाव शुभमच्या आयुष्याला साजेसे आहे. कारण, शुभमने त्याचे बीसीएचे शिक्षण अर्धवट सोडले आहे. तो आपल्या स्टॉलवर चहासह मॅगीही विकतो. दरम्यान, त्याच्या स्टॉलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्याच्या पाठीमागे स्टॉलचे एक पोस्टर दिसत आहे, ज्यावर शुभमचा एक अतिशय मनोरंजक बायो देखील लिहिलेला आहे.

आयुष्यातील टेन्शन बाजूला सारून काकांनी केला जबरदस्त नागीण डान्स; Viral Video घातला इंटरनेटवर धुमाकूळ

एका रिपोर्टनुसार, शुभमने क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये दीड लाख रुपये गुंतवले आणि काही महिन्यांतच ते ३० लाख रुपयांपर्यंत वाढले. याबद्दल लोकांना माहिती मिळाली असता, शुभम क्रिप्टोद्वारे पेमेंट कसा घेतो हे जाणून घेण्यात अनेकांनी रस दाखवला. अनेकांना तर एक काप चहासाठी क्रिप्टो करन्सी देणे मजेशीर वाटते. शुभमच्या स्टॉलवर चहा घेण्यासाठी, ग्राहकांना सहसा क्युआर कोड स्कॅन करून रूपये डॉलरमध्ये रूपांतरित करावे लागतात आणि क्रिप्टोमध्ये पैसे द्यावे लागतात. इथे एका चहाची किंमत २० रुपये आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitcoin frustrated dropout named tea vendor chai ki tapri in bengaluru accepts payments in cryptocurrency netizens are amazed pvp
First published on: 02-10-2022 at 16:00 IST