अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BJP Members Beaten On Road Video: मणिपूर मधील हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत असताना आता एक नवा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या व्हिडीओमध्ये लोक भाजप कार्यकर्त्यांच्या गटाला मारहाण तसेच धक्काबुक्की करताना आढळून आले. नेमकं हे प्रकरण काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया ..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Er Sugna Meena ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर यूजर्स देखील हा व्हायरल दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हायरल व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड केला आणि त्यातून कीफ्रेम्स काढल्या. आम्ही सर्व कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज शोध चालवला. पण यातून आम्हाला कोणतेही विश्वासार्ह लीड मिळाले नाही. मात्र, व्हिडिओत १ मिनिट १६ सेकंदावर एक माणूस ‘गोरखा को क्या समझा है?’ असं ओरडतो.

मग आम्ही ‘BJP workers heckled with Gorkha ko kya samajh rakha hai’ असे कीवर्ड वापरून गुगल सर्च इंजिनवर सर्च केले.

यामुळे आम्हाला जनता का रिपोर्टरच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला एक रिपोर्ट सापडला. या आर्टिकल चे शीर्षक होते: भाजप बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांच्यावर दार्जिलिंगमध्ये हल्ला, गोरखा तरुणांकडून बेदम मारहाण

BJP’s Bengal chief Dilip Ghosh attacked in Darjeeling, leaders thrashed mercilessly by Gorkha youth

हे आर्टिकल ऑक्टोबर ६, २०१७ रोजी प्रकाशित झाले होते. या आर्टिकल मध्ये लिहिले होते की, गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाच्या प्रदेश दौऱ्यादरम्यान त्यांना दार्जिलिंग सोडण्यास भाग पाडल्याची घटना घडली. व्हिडिओमध्ये संतप्त गोरखा तरुण भाजप नेत्यांना बेदम मारहाण करताना आणि लाथ मारताना दिसत आहेत. वृत्तानुसार, भाजप समर्थक आणि गोरखा आंदोलकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर घोष त्यांच्या शिष्टमंडळासह पक्ष कार्यकर्त्यांच्या ‘विजय संमेलना’चा एक भाग म्हणून तेथे पोहोचले होईल तेव्हा परिस्थिती बिघडली.

आम्हाला ही बातमी आऊटलूकच्या वेबसाईट वर देखील सापडली.

एबीपी न्यूजने त्यांच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आम्हाला आढळला.

रिपब्लिक वर्ल्डने पाच वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडिओही आम्हाला सापडला.

आम्हाला या घटनेशी संबंधित काही अजून बातम्या सापडल्या.

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/bjps-bengal-president-dilip-ghosh-assaulted-in-darjeeling/articleshow/60958412.cms
https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/darjeeling-mob-chases-bjp-state-prez-thrashes-colleagues/articleshow/60963689.cms

निष्कर्ष: दार्जिलिंगमध्ये भाजपचे बंगालचे प्रमुख दिलीप यांना व इतर कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीचा २०१७ चा व्हिडीओ अलीकडचा आणि मणिपूरचा सांगून व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp members beaten by legs on road video comes in light claiming after manipur naked women parade incident fact check svs