Viral photo: काही वर्षांपूर्वी, ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. यावरून बरेच मीम्स बनवले गेले. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी ५० रुपयांच्या नोटेवर एक गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून प्रेम संदेश पाठवला जायचा. मात्र आता संपर्क करण्याची साधने बदलली आहेत. सोशल मीडियाच्य काळातही आजही अनेकजण नोटेवर संदेश पाठवताना दिसत आहेत. मात्र एका पठ्ठ्यानं थेट स्टँप पेपरवर आपल्या गर्लफ्रेंडसाठी खास मेसेज लिहला आहे. वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेजेस वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच अनेकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण होईल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या स्टँप पेपरवर नेमकं लिहलंय तरी काय? तर या स्टँप पेपरवर “मरेपर्यंत मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन…लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच करेन नाहीतर असाच राहीन…माझे शब्दच हेच माझं वचन आहे. आय लव्ह यू पूजा” असा आशय लिहला आहे.  या स्टँप पेपरमार्फत तरुणानं आपल्या गर्लफ्रेंड पूजाला सिक्रेट मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. पण हा मेसेज बहुदा फेल गेला असल्याची शक्यता आहे. कारण हा स्टँप पेपर आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पाहा फोटो

आता दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र करणाऱ्यांची कमी नाही. किती तरी लोक असे आहेत, जे अशा कपलला भेटवण्यासाठी जमीन-आकाशही एक करतात. हा स्टँप पेपर पाहून किंवा ही पोस्ट पाहिल्यानंतरही असंच काहीसं घडतं आहे.या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण पूजापर्यंत हे पोहचवणारच असा निश्चय केला आहे. हा मेसेज त्या पूजेपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend write message for girlfriend on stamp paper goes viral on social media srk