Brain Teaser: शनिवार- रविवारची सुट्टी मनसोक्त घालवल्यावर आता पुन्हा कामावर रुजू होताना थोडा कंटाळा येणं, कामात लक्ष न लागणं, सतत डोक्यात वेगळेच विचार येणं हे साहजिक आहे. मग अशावेळी बुद्धीला चालना देण्यासाठी मेंदूला सक्रिय करणे गरजेचे आहे. यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रकारचे सामान्य ज्ञानाचे, ऑप्टिकल इल्युजनचे, प्रश्न पोस्ट केले जातात. आज सुद्धा आम्ही एक ‘ब्रेन टीझर’ घेऊन आलो आहोत जे ९९% नेटकऱ्यांना सोडवता आलेले नाही. यामध्ये तुम्हाला साध्या गणिताच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पण हो, यासाठी तुम्हाला पेन- कागद किंवा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी नाही.
@quiz_master_idea इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या प्रश्नात उत्तरांचे चार पर्याय दिलेले आहेत. प्रश्न असा आहे की, तुम्हाला पुढील संख्यांच्या मालिकेतील पुढील संख्या शोधायची आहे.
प्रश्न
3, 6, 3, 12, 7,?.
उत्तरांचे पर्याय
a) 36
b) 42
c) 50
d) 40.
या व्हायरल पोस्टला आतापर्यंत 72,000 हून अधिक व्ह्यूज मिळाली असून संख्या अजूनही वाढत आहे. कमेंटमध्ये बहुसंख्य नेटकऱ्यांनी ४२ हा पर्याय निवडला आहे तर काहींनी ३६ हे उत्तर दिले आहे. यातील एका नेटकऱ्याने उत्तराचे स्पष्टीकरण देताना लिहिले की,
3 × 2 = 6, 3×4=12, 7×6= 42
हे ही वाचा<< ६० जिवंत जंतांनी महिलेच्या डोळ्यात केलं होतं घर, एक एक करून बाहेर येताच..; डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण
तुम्ही या मालिकेतील पुढच्या संख्येचा अंदाज लावू शकता का? तुमचं उत्तर काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा.