Bride dance video: सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नातील अनेक परंपरा तर कधी गमतीदार गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. त्यात पुन्हा एकदा लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती अन् नाच गाणी सगळं काही आलंच. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. आजकाल लग्नाची परंपरा जरा वेगळी झालीये. अनेक लग्नात संगीत हा प्रकार पहायला मिळतो. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
लग्नात हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बॅंजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्न होऊन सासरी जाणारी नवरीदेखील अगदी या हळदीत मनसोक्त नाचते. हळद प्रत्येक नवरीसाठी अगदी खास असते.
स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी वधू आणि वर डान्स करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये वधू मनापासून नाचताना दिसत आहे. पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी नवरगदेवासमोर हळदीत भन्नाट नाचली आहे.
पाहा व्हिडीओ
लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.