Dance Viral Video: सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावून प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा लग्नातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव- नवरी एकमेकांसोबत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत.नवरा-नवरीने मराठमोळ्या गाण्यावर केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, नवरा नवरीचे रोज वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरा नवरीनं जबरदस्त डान्स केला आहे.

यावेळी नवरी-नवरदेवाच्या डान्स मूव्हज् पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी दोघेही खूप आकर्षक दिसत आहेत. नवरदेव आणि नवरीने सेम रंगाचे कपडे घातले आहेत. नवरा नवरी हा डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ _kokanimulga या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom romantic dance on on engagement ceremony video goes viral on social media srk