Interim Budget 2024 Nirmala Sitharaman Saree : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केला, यावेळी सीतारमण यांनी परिधान केलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सीतारमण यांनी यंदा लाल तर निळ्या रंगाला प्राधान्य दिले. ज्यावर पानांची बुट्टी आणि किनार सोनेरी रंगाची होती. दरवेळीप्रमाणे याही वेळी त्यांचा पेहरावात साधेपणा दिसून येत असला तरी त्यांची निळ्या रंगाची साडी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पासाठी टसर सिल्क प्रकारची साडी नेसली होती. तर कांता वर्क केलेले ब्लाउज परिधान केले होते. या साडीबरोबर त्यांनी सोनेरी रंगाची शाल कॅरी केली आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या ‘टसर सिल्क’ साडीच्या प्रकाराला ‘जंगली सिल्क’ किंवा ‘कोसा सिल्क’ असेही म्हणतात. काही ठराविक जातीच्या रेशमी किड्यांना वर्षभर अर्जुन, साग, साल, जांभूळ, ओक वगैरे जंगलातील झाडांची पानं खायला महिनाभर खायला दिले जातात. त्यानंतर त्यांच्या कोशातून हे टसर सिल्कचे धागे काढले जातात. त्यापासून टसर सिल्कच्या साड्या बनवल्या जातात.

दरम्यान किड्यांच्या तुटलेल्या कोशातूनही अगदी काळजीपूर्वक सिल्कचे धागे काढले जातात. या धाग्यांना घिचा सिल्क असे म्हणतात. टसर सिल्कच्या साड्या विणल्या जातात. तर घिचा धागा साडीत किंवा पदरात टाकून ‘टसर-घिचा’ साड्यांचा एक सुंदर प्रकारही विणला जातो. हे धाडे गोल्डन बेज रंगात असतात. . पण ओरिजलन गोल्डन धाग्यात विणलेल्या टसर सिल्क साड्या खूप प्रसिद्ध आहेत.

दरम्यान या साड्या कौशल्याने विणण्यात देवंगण समाजातील विणकर आघाडीवर आहेत. बिहारमधील ‘भागलपुरी टसर सिल्क’ आणि ओडिशातील ‘गोपालपूर टसर सिल्क’ प्रसिद्ध आहे. पण या टसर सिल्क साड्यांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. यात पश्चिम बंगालमध्ये या साड्यांवर हाताने केलेले कांता वर्क कलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या ब्लाउजवरही हे कांता वर्क केलेले दिसून आले.

निर्मला सीताराम यांचे भारतीय पारंपारिक लूक आणि विशेषत: हातमागाच्या साड्यांवरील प्रेम आजवर लपून राहिलेले नाही. अनेकदा त्या यातून वोकल फॉर लोकचा संदेश देत असतात. गेल्या वर्षी त्यांनी नवलागुंडा भरतकाम असलेली हाताने विणलेली लाल इकल साडी निवडली होती. कर्नाटकातील धारवाड येथील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ती भेट म्हणून दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2024 nirmala sitharaman chooses tussar silk blue kantha stitch saree for interim budget 2024 sjr