Viral Video: लोकल, रिक्षा, टॅक्सी, बस आदी अनेक वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. ट्रेनपेक्षा काही प्रवाशांना बसचा प्रवासही सोयीस्कर वाटतो. कारण बसचा प्रवास हा कमी खर्चिक असतो. तसेच आता प्रवाशांसाठी एसी बसची सुद्धा सेवा सुरू केली आहे. काही ठिकाणी बसमध्ये चढण्यापूर्वी प्रवासी रांगेत उभे असताना कंडक्टरकडून पैसे देऊन तिकीट काढून घेतात. तर कधी बसमध्ये प्रवासादरम्यान कंडक्टरकडून पैसे देऊन तिकीट काढावे लागते. पण, जर प्रवासादरम्यान बसमध्ये कंडक्टरच नसेल तर… आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बस चालक कंडक्टरला विसरून पुढे निघून गेला आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही प्रवासी बसमध्ये बसले आहेत. त्यातील एका प्रवाशाला बसमध्ये कंडक्टर नाही असे लक्षात येते. तेव्हा तो अगदी प्रामाणिकपणे जाऊन बस चालकास सांगतो. प्रवाशाने सांगताच बस चालक रस्त्याकडेला बस थांबवतो. प्रवासी आपल्या जागेवर बसायला येताच सर्व प्रवासी हसायला सुरुवात करतात. तसेच बस चालकासह प्रवासी सुद्धा कंडक्टरची वाट पाहू लागतात. कंडक्टर बसमध्ये परत आले का? त्यांना बसपर्यंत कोण घेऊन आलं ? व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा .

हेही वाचा…उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी पठ्ठ्याचा जुगाड; दुचाकीवर बसवला शॉवर अन्… ; पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्रवासी आणि बस चालक कंडक्टरची वाट पाहत असतात व रस्त्याकडे आशेने पाहत असतात. तितक्यात एका दुचाकी स्वराच्या मागे बसून कंडक्टर येताना दिसतो. कंडक्टरला त्याची बस दिसते आणि तो दुचाकी स्वाराला गाडी थांबवून तेथे उतरतो आणि बसमध्ये चढतो.कंडक्टर बसमध्ये प्रवेश करताच सगळे जण पोट धरून हसायला लागतात. कंडक्टर पुढे जाऊन बस चालकास काहीतरी म्हणतो आणि येथे व्हिडीओचा गोड शेवट होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mhpattern या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बसमध्ये उपस्थित एका अज्ञात प्रवाशाने हा मजेशीर प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडीओला ‘बसचालक कंडक्टरला बसमध्ये घ्यायला विसरले’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तर काही जण मजेशीर कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.