एखाद्याच्या शारीरिक स्थितीच्या आधारे त्यांची चेष्टा करणे हा गैरवर्तन समजले जाते. पण ब्रिटनच्या एका न्यायालयाने याला ‘लैंगिक छळ’ असं म्हटलं आहे. रोजगार न्यायाधिकरणाने आपल्या निकालात एखाद्या व्यक्तीला ‘टकला’ म्हणणे म्हणजे लैंगिक छळ आहे, असे म्हटले आहे. एका कर्मचाऱ्याची, आपल्याला ‘टकला’ म्हटले जात असल्याची तक्रार कोर्टात पोहोचल्यावर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. वेस्ट यॉर्कशायरमधील ब्रिटिश बंग कंपनीत २४ वर्षे काम करणाऱ्या टोनी फिनला गेल्या वर्षी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते, त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेलीमेलच्या बातमीनुसार, टोनी फिनने कोर्टात अनेक दावे केले, त्यापैकी एक लैंगिक छळाचा होता. त्याने सांगितले की, एका घटनेदरम्यान त्याला कारखाना पर्यवेक्षक जेमी किंगकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला. फिनने आरोप केला आहे की, जुलै २०१९ मध्ये किंगने तिला ‘टकला’ बोलवून शिवीगाळ केली होती. न्यायाधीश म्हणाले की पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त केस गळतात, त्यामुळे एखाद्यासाठी हा शब्द वापरणे म्हणजे एक प्रकारचा भेदभाव करण्यासारखे आहे.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

अनुभवी इलेक्ट्रिशियन आणि त्याच्या कंपनीचे नियोक्ते यांच्यातील वादावर तीन सदस्यीय पॅनेलने आपला निर्णय दिला. न्यायालयाने एखाद्या पुरुषाला ‘टकला’ बोलावले जाण्याची तुलना स्त्रीच्या स्तनावरील टिप्पणीशी केली. न्यायाधीश जोनाथन बायर्न यांच्या नेतृत्वात पॅनलने टोनी फिनने केलेल्या आरोपांवर विचारविनिमय केला. त्याच्या टक्कल पडण्यावरील टिप्पणी हा केवळ अपमान आहे की छळ आहे, यावर त्यांनी सखोल चर्चा केली. यानंतर पॅनल म्हणाले की, ‘आमच्या निर्णयानुसार, ‘टकला’ हा शब्द आणि लिंगाची जतन केलेली वैशिष्ट्ये यांचा परस्परसंबंध आहे.’

ते म्हणाले की, “आम्हाला ते स्वाभाविकतः लैंगिकतेशी संबंधित आढळते.” किंगने फिनला नाराज करण्यासाठी त्याच्या दिसण्यावर ही टिप्पणी केली, जी बहुतेक वेळा पुरुषांमध्ये आढळते. त्यामुळे फिनसाठी ‘टकला’ हा शब्द वापरणे हे अपमानास्पद असल्याचे न्यायाधिकरणाने मानले. यामुळे फिनच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन झाले आणि त्याच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling a man bald is like sexual harassment if you make fun of someone you have to go to jail pvp