हवेत उडून कार थेट आदळली झाडावर, विचित्र अपघाताचा Video Viral

व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

car accident
घटनेचा व्हिडीओ व्हायरल (फोटो: @clownabsolute1 / Twitter)

Viral Video: रस्त्यावरून चालताना अनेकवेळा अपघातांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा हे जाणूनबुजून किंवा नकळत घडते, जे पाहिल्यानंतर आपण स्तब्ध होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कार हवेत उडी मारून थेट झाडावर आदळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एखादे वाहन हवेत उडून आणि थेट झाडाला धडकत आहे. सोशल मीडियावरचा हा व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विचार करत आहेत की असे कसे होऊ शकते. व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

(हे ही वाचा:‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral)

(हे ही वाचा: Ranji Trophy Final: मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने जिंकली सगळ्यांची मनं, ‘या’ कृतीमुळे होतंय कौतुक)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ clownabsolute1 नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट करत आहेत आणि लिहित आहेत ‘हे रहस्य आहे का?’ दुसरीकडे, दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘खरोखर खूप भयानक व्हिडीओ.’ सोशल मीडियावर हा व्हिडीओ ३७ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car flying in the air collided directly with tree video viral of the accident ttg

Next Story
एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी