Car message video: या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि तिचं स्वागत करता यावं यासाठी काही काही पुरुष तर ९ महिने डोळे लावून वाट पाहत असतात. जन्माला आल्यानंतर आई त्या बाळाचं खाणं-पिणं पाहते पण वडिल मात्र तिच्या उठण्यापासून झोपेपर्यंतच्या वेळात तिच्याकडे कौतुकाने पाहत तिची प्रत्येक गोष्ट आपुलकीने करतो. कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात. मात्र आजही समाजात अशा मानसिकतेची लोकं आहेत जी मुलींच्या जन्मानंतर नाकं मुरडतात तर मुलींच्या पालकांकडे तुच्छ नजरेनं पाहतात. अशाच एका वडिलांनी तिनीही मुलीच का? असं विचारणाऱ्या खूप सूंदर असं उत्तर दिलं आहे.
ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बापानं आपल्या लेकीसाठी लिहलेला खास मेसेज वाचून सगळेच भावूक झाले आहेत.
आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय कारवर… तर या कारवर “तुम्ही मला अजिबात घाबरवू शकत नाही कारण मला तीन मुली आहेत..” मुलींना ओझ समजणाऱ्या आणि मुलींना कमकुवत समजणाऱ्यांना या वडिलांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.
पाहा व्हिडीओ
लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते. मुलीला वाटत असते की आपला बाप काहीही करू शकतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना भावुक करत आहे.