प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यास, परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. पण, कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात, असंही दिसून येतं. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी विचित्र कृत्य करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात. याशिवाय जुगाडशी संबंधित व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्हीही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, सध्या एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाची उत्तरपत्रिका दिसत आहे. या पेपरमध्ये मुलाने एका प्रश्नाचे असे उत्तर दिले आहे की ते वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

उत्तरपत्रिकेत काय लिहिलं आहे?

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये उत्तरपत्रिका दिसत आहे. प्रश्न सर्वात वर लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली उत्तर लिहिले आहे. प्रदूषण कसे टाळता येईल, हा प्रश्न आहे. या प्रश्नावर मुलानं लिहिलेलं उत्तर वाचून तुम्हीदेखील दंगच व्हाल. प्रथम मुलाने लिहिले, “वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यांमधून निघणारे पाणी आणि प्रदूषित हवा कमी केली तरच प्रदूषण टाळता येईल, ” असं लिहिलं. यानंतर मुलाने ‘बहुत प्यार करते हैं’ हे बॉलीवूड गाणे लिहिले आहे आणि शेवटी लिहिलं आहे की, “ही सर्व खबरदारी घेतली तरच प्रदूषण टाळता येईल.”

(हे ही वाचा : रेल्वे रुळावर अडकला ट्रक, काही मिनिटांत सुस्साट वेगात आली ट्रेन अन्… अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल )

व्हायरल पोस्ट येथे पाहा

ही पोस्ट bittusharmainsta नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही पोस्ट शेअर करण्यात आली होती, जी आता पुन्हा व्हायरल होत आहे. पोस्ट वाचल्यानंतर एका युजरने लिहिले, “हे मूल देशाचे भविष्य ठरवेल. दुसऱ्या युजरने लिहिले, “हा भावी आयएएस अधिकारी आहे.”, अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्सनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत.