बद्धकोष्ठता समजून बायको करत होती उपाय; डॉक्टरकडे गेल्यावर कळलं प्रायव्हेट पार्ट मध्ये चक्क…

बद्धकोष्ठ, अपचन समजून त्याच्या पत्नीने सगळे घरगुती उपाय करून पाहिले पण काही केल्या परिणाम दिसत नव्हता. शेवटी डॉक्टर कडे जाऊन जेव्हा एक्स- रे काढला तेव्हा…

बद्धकोष्ठता समजून बायको करत होती उपाय; डॉक्टरकडे गेल्यावर कळलं प्रायव्हेट पार्ट मध्ये चक्क…
(फोटो: प्रातिनिधिक/ Pixabay)

बायकोच्या दराऱ्यात राहणारे पुरुष क्वचितच पाहायला मिळतात पण या काही टक्के पुरुषांमध्ये आपल्या बेटर हाफ विषयी जी भीती असते तिला काही तोड नाही. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. झालं असं की, इराण मधील एका ५० वर्षीय व्यक्तीला प्रचंड पोटदुखीचा त्रास होत होता, इतका की तो अक्षरशः पोट पकडून कळवळायचा. अनेक दिवसांपासून त्याला शौचासही होत नव्हते. बद्धकोष्ठ, अपचन समजून त्याच्या पत्नीने सगळे घरगुती उपाय करून पाहिले पण काही केल्या परिणाम दिसत नव्हता. शेवटी डॉक्टर कडे जाऊन जेव्हा एक्स- रे काढला तेव्हा यामागचं खरं कारण समोर आलं.

इराणमधील या व्यक्तीला पोटदुखी सुरु झाल्यापासूनच त्याची पत्नी डॉक्टरकडे जाण्यास सांगत होती, पण काही केल्या तो काही डॉक्टरकडे जायला तयारच होत नव्हता. जेव्हा बायकोने हट्ट धरला तेव्हा तो अखेरीस एक्स- रे काढून घेण्यास गेला. या एक्स- रे मध्ये जे समोर आलं त्यानंतर डॉक्टरांसहित या व्यक्तीच्या पत्नीला सुद्धा धक्का बसला. या इसमाच्या गुदद्वारात चक्क एक प्लास्टिकची बॉटल अडकलेली होती. अर्थात हे कारण त्याला माहीत होते मात्र पत्नीच्या भीतीने त्याने याबाबत वाच्यता केली नव्हती.

जेवणानंतर शतपावली शक्य नाही? बसल्या जागी करा ‘हे’ उपाय; गॅस, अपचनावर रामबाण

दरम्यान, डॉक्टरांसमोर सर्व खुलासा करताना या व्यक्तीने आपण लैंगिक आनंदासाठी ही बाटली आत टाकली होती मात्र नंतर ती अडकून बसली अशी कबुली दिली. या अडकलेल्या बाटलीमुळे त्याला शौचास होत नव्हते आणि पोटदुखी मागे सुद्धा हेच कारण होते. अखेरीस ही खरी समस्या समजल्यावर डॉक्टरांनी सर्जरी करून ही बॉटल बाहेर काढली. सध्या या व्यक्तीची प्रकृती व्यवस्थित आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Optical Illusion: या चित्रात लपलेले ५ पक्षी तुम्ही शोधू शकता का? फक्त १% लोकांनी दिले अचूक उत्तर
फोटो गॅलरी