बाजारात अनेक स्टॉलवर विविध सरबते सहज मिळतात. पण, बरेच जण घरीच फळांचा रस मिक्सरमध्ये काढून घेऊन सरबताचा आनंद घरीच लुटतात. पण, तुम्ही कधी मिक्सरचा उपयोग न करता सरबत बनवण्यात आलेलं पाहिलं आहे का? नाही, तर या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला पहायला मिळेल. तुम्ही आतापर्यंत भारतीयांना अनेक जुगाड करताना पाहिलं असेल. तर भारतातील भन्नाट जुगाडाची एक झलक परदेशातसुद्धा पहायला मिळाली. एक व्यक्ती सरबत बनवण्यासाठी एका अनोख्या गोष्टीचा वापर करताना दिसून आली; जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

व्हायरल व्हिडीओत व्यक्तीला फळांचा रस काढून घ्यायचा असतो. त्यासाठी तो मिक्सरच्या भांड्यात फळांचे तुकडे करून घेतो आणि मिक्सरच्या भांड्यात घालतो. पण, व्यक्ती हे भांडं मिक्सरवर न ठेवता एक अनोखा जुगाड करतो. मिक्सरच्या भांड्याखाली एक ड्रिल मशीन लावतो आणि फळांचा रस काढून घेतो व मजेशीर गोष्ट अशी की, ड्रिल मशीन अगदीच मिक्सरसारखे काम करते. तसेच अशा खास पद्धतीत व्यक्तीने जुगाड करून सरबत बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला.

हेही वाचा…झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक; पण शेवटी मस्करीची झाली कुस्करी…पाहा धक्कादायक VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

ड्रिल मशीनचे केले मिक्सरमध्ये रूपांतर :

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मिक्सरच्या भांड्याच्या खालच्या भागात व्यक्ती ड्रिल मशीन लावतो आणि फळांचा रस काढून घेतो आणि अशाप्रकारे मिक्सरचा उपयोग न करता सरबत बनवून घेतो; हे पाहून व्यक्तीची पत्नीदेखील हसायला लागते. तसेच हा खास जुगाड पाहून सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @p4ulx_ch या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ड्रिल मशीनच्या सहाय्याने सरबत बनवलेले पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही जण हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत.