Viral Video: अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची आवड वाढल्याचे दिसून येत आहे. मांजर, श्वान, कासव आदी प्राण्यांना अगदी आवडीने घरात पाळले जातेय. पण, काही जण भटक्या प्राण्यांचीही काळजी घेतात. प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते. त्यामुळे माणूस आणि प्राण्यांमध्ये एक प्रेमाचे नाते तयार होते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक गाय भाजीविक्रेत्याला मायेने कुरवाळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ एका भाजीविक्रेत्याचा आहे. भाजीविक्रेता त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला भाजी विकताना दिसतो आहे. या व्यक्तीजवळ एक गाय येऊन उभी आहे. अन्नाच्या शोधात आलेली गाय भाजीविक्रेत्याला मायेने कुरवाळत, जणू काही मिठी मारताना दिसते आहे. भाजीविक्रेता ग्राहकाला भाजी देऊन झाल्यावर गाईला टोमॅटो खाऊ घालतो. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…मैं कोई ऐसा गीत गाऊँ! गिटार हातात घेऊन आजोबांनी गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, ‘व्वा क्या बात’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अन्नाच्या शोधात असणारी गाय भाजीविक्रेत्याला कुरवाळते आहे आणि नकळत काहीतरी खायला देण्याचा इशारासुद्धा करते आहे. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, जोपर्यंत तो विक्रेता भाजी देत ​​नाही तोपर्यंत गाय कोणतीही भाजी खात नाही. त्यामुळे या गाईचे आणि मोठ्या मानाने खाऊ घालणाऱ्या या विक्रेत्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @drvikas1111 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘भाजीविक्रेता मनाने श्रीमंत आहे. तर दुसरीकडे या व्हिडीओतील सौंदर्य पाहा- गायमाता विक्रेत्याने भाजी दिल्याशिवाय कोणतीही भाजी स्वतःहून खात नाही’, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow cuddling seller then vendor feeding the some vegetables to her video winning hearts online asp