Desi Wife Dancing in Saree with Foreign Husband: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. यातील अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. सोशल मीडियावर असे अनेक जोडप्यांचे व्हिडीओ आहेत, ज्यात पती-पत्नीमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी असते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दाम्पत्य सुंदर डान्स करताना दिसत आहे.

इंटरनेटवर सध्या एक हृदयस्पर्शी आणि धमाल व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक देशी बायको आपल्या परदेशी नवऱ्यासोबत कुमार सानूच्या “अख्खा इंडिया जानता है” या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसते आहे आणि नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतेय. त्यांच्या डान्सने सोशल मीडिया युजर्सचे भरभरून मनोरंजन केलं आहे.

हा व्हिडीओ ६ जून रोजी Jamuna नावाच्या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला असून, अवघ्या काही दिवसांतच त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजींचा अक्षरशः पाऊस पडतोय. व्हिडीओची सुरुवात होते एका भारतीय स्वयंपाकघरातून. साडी नेसलेली आणि कुंकू लावलेली स्त्री किचनमध्ये स्वयंपाकाला लागलेली दिसते, पण… काही सेकंदांतच हा व्हिडीओ जबरदस्त वळण घेतो. नेमकं काय घडतेय…

डान्सचा धमाका, नवऱ्याने केला डान्स, बायकोही थिरकली!

स्वयंपाकघरात जेव्हा ती बाई गॅसवर कुकर ठेवते, तेवढ्यात तिचा परदेशी नवरा निळ्या टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये आत येतो आणि अचानक नाचायला लागतो. ते पाहून पत्नीही स्वयंपाक विसरते आणि पूर्ण देसी अंदाजात त्याच्या स्टेप्समध्ये सामील होते. या दोघांचा परफेक्ट डान्स आणि जबरदस्त केमिस्ट्री पाहून नेटकरी अक्षरशः वेडे झाले आहेत. त्यांनी असा डान्स केला की त्यांच्या स्टेप्सने नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

या परदेशी नवऱ्याने गाण्याची “फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया” ही प्रसिद्ध ओळ ज्या इमोशन्ससह कृतीतून उतरविली आहे, ती सर्वांची मनं जिंकून गेली. या डान्समध्ये देसी स्टाईल, हसरा मूड, आणि दोघांचं निखळ प्रेम प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. गाण्याचे बोल आणि त्यावरच्या त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे सगळंच पाहण्यासारखं आहे. दोघांची ट्युनिंग इतकी जबरदस्त आहे की, प्रेक्षक टाळ्यांची दाद देताना थकत नाहीत.

येथे पाहा व्हिडीओ

Jamuna कोण आहे?

Jamuna ही एक कंटेंट क्रिएटर असून, तिचे इन्स्टाग्रामवर ६०.२K फॉलोअर्स आहेत. ती नेहमी अशा डान्स रील्स आपल्या परदेशी नवऱ्यासोबत शेअर करत असते.