DJ Caused Wall to Fall Video: अलीकडे सर्वत्र लग्नांची, हादींची धामधूम पाहायला मिळतेय. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणारे विविध आजार यापूर्वी सुद्धा चर्चेचा मुद्दा ठरला आहेत. मात्र आता लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले आहे. ज्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार, डीजेच्या कंपनांमुळे लग्नाच्या मिरवणुकीत चक्क एक भिंत कोसळून अनेकजण जखमी झाले आहेत. असा दावा करण्यात येत होता कि हि घटना नागपूर मधील आहे. नेमकं या प्रकरणात किती तथ्य आहे हे सविस्तर जाणून घेऊया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर अजित कुमार सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रोफाइलवर व्हायरल दावा शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

नागपुरात अशी काही घटना घडली आहे का हे पाहण्यासाठी आम्ही गुगलवर बेसिक कीवर्ड सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला या संबंधित कोणतेही वृत्त आढळले नाही. आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि रिव्हर्स इमेज सर्च साठी काही कीफ्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला एक पोस्ट सापडली ज्यामध्ये ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे नमूद केले आहे.

कमेंट सेक्शन मध्ये एका वापरकर्त्याने माऊ पोलिसांचे एक ट्वीट पोस्ट केले आहे. भिंत जीर्ण होती आणि त्यामुळे ती कोसळली असे पोस्टमध्ये नमूद केले आहे त्यामुळे भिंत डीजेमुळे कोसळल्याचा दावा खोटा ठरतो. त्यानंतर आम्ही या घटनेबद्दल बातम्यांचे अहवाल तपासण्यासाठी गूगलवर कीवर्ड शोधले आणि विविध माध्यम संस्थांनी शेअर केलेले अहवाल सापडले.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये या घटनेचा व्हिडिओही होता.

आम्हाला मिरर नाऊ वर देखील व्हिडिओ सापडला.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही नागपुरातील ANI पत्रकार सौरभ जोशी यांच्याशी संपर्क साधला. नागपुरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा<< मालदीवच्या किनारी तरुणीचा मृतदेह, बलात्काराची चर्चा सुरु? खरी बाजू वाचून व्हाल थक्क, कारण तो देह चक्क..

निष्कर्ष: यूपीमधील एका विवाह सोहळ्याच्या दुःखद घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घोशी येथे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना दाखवणारा हा वव्हिडीओ नागपूर मधील असल्याचे सांगत शेअर केला जात होता मात्र व्हायरल दावा खोटा आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dj noise caused wall falling down in nagpur says viral video women are seen injured did you know reality of up accident svs