सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे. जी देशी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण एका व्यक्तीनं असा प्रकार केला, ज्यामुळे आपला जीव देखील त्याने धोक्यात टाकला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चौकात लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. प्रत्येकजण वरच्या दिशेनं पाहत आहे. पुढच्याच क्षणी जेव्हा कॅमेऱ्याचा अँगल बदलतो तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबावर एक व्यक्ती पडलेली दिसते. तुमच्याप्रमाणेच तिथे उपस्थित असलेला जमावही विचार करत आहे, की हा माणूस वर कसा चढला आणि तिथे काय करतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भयंकर! खेळताना चिमुकली गुदमरली, ४ दिवस मृत्यूशी झूंज अखेर अपयशी, काळीज पिळवटून टाकणारी घटना

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने आश्चर्यचकित होऊन विचारलं आहे की, आधी तो माणूस खांबावर कसा चढला ते सांगा. त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, तो मद्यपान केल्यानंतर खरोखरच उडाला. आणखी एका यूजरने लिहिलं, ये है हस्ती का बस्ती ब्रो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk man climbs on electricity tower video viral on social media srk