राजस्थानमधील अलवर येथील एका धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भरधाव वेगात आलेल्या बोलेरो कारने रस्त्याच्या कडेने चालत असणाऱ्या वृद्ध जोडप्याला जोराची धडक दिली आहे. ज्यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलीला भेटून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की हे दाम्पत्य उडून काही फूटांवर जाऊन पडलं होतं. ही घटना NEB पोलीस स्टेशन हद्दीतील 200 फूट रोड येथील आहे. पोलीस सुंत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेले वृद्ध दाम्पत्य हे खुदनपुरी येथील रहिवासी आहे. तर या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

हेही पाहा- समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमधून फोटोग्राफरने कैद केला ‘जलदेवी’चा चेहरा, Viral फोटो पाहून व्हाल थक्क

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेले. तर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दाम्पत्याचा मुलगा जयसिंग याने सांगितलं की, वडील मोहनलाल आणि आई धन्वंतरी बहिणला त्यांच्या मुलीला भेटून घरी येत होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोने दोघांनाही धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही पाहा- Video: तरुणाचा लग्नातील तो डान्स अखेरचा ठरला; लोक शिट्टी वाजवत राहिले आणि तो मृत्यूशी झुंजत…

अपघाताच्या या घटनेनंतर आरोपी कारचालक घटनास्थळी वाहन सोडून पळून गेला आहे. तर कारमधील तरुणांनी दारू पिल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिस तपासातही कार चालक दारुच्या नशेत असल्याचं उघडकीस आलं आहे. दरम्यान, कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंद करुन आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunken driver crushed elderly couple in alwar rajasthan watch shocking viral video jap