ओळखलंत का? दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास; प्रवाशांनी पाहूनही असं काही केलं की..

विजय देवरकोंडा, नसरुद्दीन शहा, अनन्या पांडे यांचे ट्रेन प्रवासाचे फोटो आपण पाहिले असतील. या यादीत थेट दुबईच्या राजकुमाराचे नाव सुद्धा जोडले गेले आहे.

ओळखलंत का? दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास; प्रवाशांनी पाहूनही असं काही केलं की..
दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास (फोटो: इंस्टाग्राम)

हल्ली सेलिब्रिटी ते राजकारणी अनेकांना सामान्य नागरिकांप्रमाणे ट्रेन, मेट्रो मधून प्रवास करणे आवडू लागले आहे. एखाद्या मीटिंग साठी जायचे असो वा चित्रपटाचं प्रमोशन असो अनेक प्रसिद्ध चेहरे सुद्धा सार्वजनिक वाहतुकीला पसंती दर्शवतात. अलीकडेच विजय देवरकोंडा, नसरुद्दीन शहा, अनन्या पांडे यांचे ट्रेन प्रवासाचे फोटो आपणही पाहिले असतील. आता याच यादीत थेट दुबईच्या राजकुमाराचे नाव सुद्धा जोडले गेले आहे. अलीकडेच मित्र व परिवारासह पिकनिकला गेलेल्या दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतुम यांनी चक्क मेट्रो मधून प्रवास केला. गंमत अशी की हा व्यक्ती कोण याची आजूबाजूच्या प्रवाशांना साधी जाणीव सुद्धा झाली नाही.

शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतुम यांनी आपल्या मेट्रो प्रवासाचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले होते. लंडन अंडरग्राऊंड मेट्रो मधील हा फोटो त्यांच्या १४. ५ मिलियन फॉलोवर्ससमोर शेअर करताच अनेकांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले. काही तासातच हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. आपण या फोटो मध्ये पाहू शकता की शेख हमदान हे लंडनच्या मेट्रो मध्ये गर्दीत उभे राहून प्रवास करता आहेत यावेळी बद्र अतीज हा त्यांचा मित्र सुद्धा सोबत दिसत आहे. विशेष म्हणजे मेट्रो मधील अन्य प्रवासी या दोघांनाही ओळखू शकले नाहीत.

तिने एक डोळा मारला अन.. सेलिब्रिटींना टाकलं मागे; पहा नाशिकच्या लिटिल स्टारचे Viral Video

दुबईच्या राजकुमाराचा मेट्रो प्रवास

याशिवाय दुसऱ्या एका फोटो मध्ये दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे देखील लंडनमध्ये सुट्टीवर असताना शेख हमदानसोबत दिसून आले. राजकुमार शेख हमदान यांनी इंस्टाग्रामवर वडील आणि दोन मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता.

Video: भेळपुरी विकताना मोबाईल सुरु केला अन.. सेकंदात व्हिडिओ Viral झाला, तुम्हीच पहा

दरम्यान, मेट्रो मध्ये जरी कोणाचे राजकुमार हमदान यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नसेल, तरी गेल्या महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात शेख हमदान लंडनमधील दुबईच्या रहिवाशांसोबत सेल्फी घेताना दिसले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dubai crown prince sheikh hamdan bin mohammad al makotum travels via metro check passengers reaction svs

Next Story
चिमुकल्याने गायलेलं गोंडस राष्ट्रगान ऐकून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध; हा Viral Video एकदा पाहाच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी