सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला आश्चर्यचकीत करणारे तर काही पोट धरुन हसायला लावणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो जेवढा मजेशीर तेवढाच आश्चर्यकारक आहे. आपण अनेकदा लग्न समारंभात लोकांना नागिन डान्स करताना पाहतो. यातील काही लोक रस्त्यावर देहभान विसरुन नागिन डान्स करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण सध्या व्हायरल होत असलेला नागिन डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण एका महिलेने चक्क कोर्टामध्ये नागिन डान्स केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. महिलेच्या या नागिन डान्सचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला फरशीवर सापाप्रमाणे लोळताना दिसत आहे. तर या वेळी ती हाताने फणा काढल्याची हावभाव देखील करत आहे. कोर्ट रूममध्ये सुनावणी सुरू असताना एक महिला अचानक फरशीवर पडून नागिन डान्स करु लागल्यामुळे उपस्थितांना धक्का बसल्याचंही पाहायला मिळत आहे.

महिलेने कोर्टामध्ये सुरू केला नागिन डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे. येथील कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू असताना ती महिला फरशीवर पडली आणि सापासारखा आवाज काढात नाचू लागली. व्हिडिओमध्ये, ही महिला जोरजोरात आरडाओरडाही करत असल्याचही दिसत आहे. शिवाय तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर ही महिला इकडे तिकडे हातपाय हालवत नागिन डान्स कराताना दिसत आहे. शिवाय यावेळी ती वेगवेगळे विचित्र आवाजही काढत असल्याचं ऐकू येत आहे. महिलेच्या या कृत्यामुळे संपूर्ण कोर्ट रूममध्ये विचित्र वातावरण निर्माण झालं होतं.

न्यायाधीश आणि पोलिसांसमोर महिलेने केला डान्स –

दरम्यान, तिथे उपस्थित लोकांनी महिलेला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा नागिन डान्स थांबला नाही. महिलेच्या या कृत्याने तेथे उपस्थित असलेले न्यायाधीश, पोलीस सगळेच चक्रावून गेले. शिवाय याआधीही तुम्ही सोशल मीडियावर नागिन डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण असा कोर्ट रुममधील नागिन डान्स पहिल्यांदाच पाहिला असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the hearing in the court the woman performed naagin dance in front of the judge video went viral jap