गरुड, ससाणा आणि गिधाड यांसारख्या पक्ष्यांना शिकारी पक्षी म्हटलं जातं. जेव्हा ते इतर प्राण्यांवर हल्ला करायला जातात, तेव्हा ते त्यांना एका झटक्यात पकडून त्यांची शिकार करतात. त्यांचा हल्ला अतिशय धोकादायक असतो की इतर पक्ष्यांना त्यांच्यापासून बचाव करणं कठीण होऊन जातं. या पक्ष्यांचा आकारही मोठा आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गरुड दिसत आहे, जे इतर गरुडांपेक्षा खूप वेगळं आणि मोठं आहे. ते इतकं मोठं आहे की फक्त एका पंजाने शिकार पकडताना दिसतं. या गरुडाने चक्क कोल्ह्याच्या तोंडातून घास पळवला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गरूडानं त्याच्या तोंडातलं भक्ष्य पळवलं. या कोल्ह्यानं एका सशाची शिकार केली होती. या सशाला घेऊन तो सुरक्षित स्थळी पळत होता. पण तेवढ्यात पाठीमागून एक गरूड आला अन् त्यानं कोल्ह्याच्या तोंडामधील घास अक्षरश: खेचून घेतला. अर्थात कोल्ह्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण गरूडाच्या ताकतीपुढे त्याचं काहीच चाललं नाही.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/Ct4ldR6oS6q/?igshid=MzRlODBiNWFlZA==

हेही वाचा >> VIDEO: पालकांनो “प्रत्येक फूल वेगळं असतं”; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी फॉलो करा, मुलं नक्की यशस्वी होतील

हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तो पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने विचारलं, की तो पक्षी कसा मेला, गरुडाने मारला का? एकाने म्हटलं, की गरूड अनेकदा त्याच्या घराच्या समोर येतात . तिसऱ्याने म्हटलं, की गरुडाने त्याला पंजाने पकडलं नाही, त्याने फक्त आपली नखं आत घातली आणि पक्ष्याला घेऊन उडून गेला. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eagle steals the rabbit from fox animal fight video viral news in marathi watch viral video on social media srk