एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटरची खरेदी केली आहे. मस्क हे आपल्या निर्णयांमुळे किंवा ट्विटमुळे कायमच चर्चेत असतात. आपण ट्विटर हे अ‍ॅप मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीकडे वापरू शकतो. मात्र ट्विटर हे App तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात जास्त जागा व्यापते. यावर मस्क यांनी एक ट्विट केले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण मोबाईल वापरत असताना अनेक Application चा वापर करतो. अनेक अ‍ॅप डाउनलोड करतो. ते अ‍ॅप आपल्या मोबाईलमधील स्टोरेज वापरत असतात. अनेकदा आपण वापरत असलेल्या अ‍ॅपमुळे आपल्या फोनचे स्टोरेज फुल होते. अतिरिक्त स्टोरेजसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. मात्र मोबाईलमध्ये सगळ्यात जास्त स्टोरेज हे ट्विटर अ‍ॅप वापरते. त्यातील डेटा क्लिअर केला तरी देखील हे ट्विटर अ‍ॅप सर्वात जास्त जागा वापरते. त्यामुळे एलॉन मस्क यांनी एक ट्विट करत युजर्सची माफी मागितली आहे.

हेही वाचा : VIDEO: टेस्लाच्या आगमनाची शक्यता असतानाच Ola ने आपल्या ‘या’ प्रोजेक्टवर सुरू केले काम; सीईओ म्हणाले, “हा भारतातातील…”

एलॉन मस्क आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ”सॉरी, ट्विटर मोबाईल अ‍ॅप खूप जागा घेत आहे.”

हेही वाचा : CSK vs GT: आयपीएल २०२३ ची फायनल पाहण्यासाठी Jio आणि Airtel चे ५०० रुपयांच्या आतील ‘हे’ प्लॅन्स ठरू शकतात फायदेशीर, जाणून घ्या

तुमच्या मोबाईलमध्ये कोणते App किती स्टोरेज घेते हे कसे बघाल ?

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही फोनच्या सेटिंग या पर्यावर क्लिक करा.
२. त्यानंतर तुम्ही डिव्हाईस स्टोरेजमध्ये जावे.
३. तिथे तुम्हाला तुम्ही वापरत असलेले App तुमच्या स्टोरेजमधील किती जागा घेतात ते दिसेल.
४. तसेच तुम्ही काढलेले फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ फाइल्सने किती जागा व्यपाली आहे ते देखील तिथे तुम्हाला दिसते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk apologized to users as twitter mobile app consumes most storage in smartphone tmb 01