Pune Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. याचंच भयान वास्तव्य दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पु्ण्यातला हा व्हिडीओ असून सध्या तो चर्चेत आला आहे.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल…

दिवाळीचा सण प्रकाश, गोडवा आणि आनंदाने भरलेला असतो. पण या सगळ्या झगमगाटातही काही क्षण आहेत जे खरोखरच विचार करायला भाग पाडतात. असाच एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा, ज्याने संपूर्ण शरीरावर चांदीचा रंग लावला आहे, तो रस्त्याच्या कडेला बसून रस्त्याने जाणाऱ्यांकडे पाहत आहे की ते कोणीतरी काहीतरी देईल. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरीबीचा आक्रोश आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गरीब कुटुंबातील एका मुलाला रस्त्याच्या कडेला बसलेले दिसत आहे. लोक त्याच्याकडे लक्ष देतील आणि त्याला काही पैसे किंवा मिठाई देतील या आशेने त्याने त्याचे शरीर रंगवले आहे. मुलासमोर एक भांडे देखील ठेवले आहे.त्याच्या आजूबाजूला, दुकाने रंगीबेरंगी दिव्यांनी आणि फटाक्यांच्या आवाजाने भरलेली असतात, पण तो मुलगा फक्त लोकांकडे पाहत आहे.सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, तर असंख्य धडे हे आयुष्य शिकवत असतं. याचंच उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला काम करत आहे.

पाहा व्हिडीओ

चिमुकल्याची ही धडपड आणि कष्टाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.