Emotional video: “प्राण्यांवर प्रेम केलं तर ते तुमच्यावरही प्रेम करतात” जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे अनेक लोक आहेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडतात सुद्धा…आपल्या जवळच्या माणसापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हाच्या वेदना या सहन करण्याच्या पलिकडे जातात. तेव्हा आपण ढसाढसा रडून मोकळे होतो. सोबतच आपल्याला काय त्रास होतोय, हे जवळच्या माणसांना सांगून आपण व्यक्त सुद्धा होतो. पण प्राण्याचं तसं नसतं. त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसांप्रमाणे भडाभडा बोलून व्यक्त होत नाही. पण वेदना त्यांना होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडू लागला. रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे नक्की.
या रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडिओ बकरी ईदशी संबंध असल्याचे म्हणत व्हायरल होत आहे. या बकरी ईदला मालक बकरा विकण्यासाठी आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मालकाने करार केला तेव्हा बकरा मालकाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला. यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. बकऱ्याचे रडणे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ऐकले, ज्यावरून कोणालाही अश्रू आवरता आले नाहीत. मालकानेही बकऱ्याला मिठी मारली. व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती नाही.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

मात्र या बकऱ्याच्या व्हिडीओने लोकांची शांतता हिरावून घेतली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना सुद्धा त्यांचे अश्रू अनावर होत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सचे डोळेही पाणावले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक या व्हिडीओवर अनेक कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहे. 

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DKgNaE_IN8j/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर हा व्हिडीओ priti_tuzi_mazi_10 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नका विकू त्याला देवाच्या रूपाने तुमच्या घरी असेल तो..” तर आणखी एकानं, “एवढा रडतोय तो तरी विकला त्याला थोडे तरी मनाला काही वाटलं नाही का?” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video goat who came to sell on eid cried by hugging owner video goes viral srk