Python Yawn Viral Video : प्राण्यांमध्ये साप, अजगराविषयी प्रत्येकाच्या मनात एक विचित्र भीती असते. अनेकांना साप, अजगराचे नाव ऐकले तरी घाम फुटतो. या प्राण्यांविषयी जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अजगराचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात अजगर जांभई देताना दिसत आहे. तुम्ही असं भयंकर दृश्य क्वचितच पाहिलं असेल, त्यामुळे अजगराचा हा व्हिडीओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय अजगर एका तळ्यात पोहत असताना अचानक बाहेर येतो. त्यानंतर तो आपलं तोंड मोठं उघडतो आणि माणसांप्रमाणेच जांभई देताना दिसतोय. पाहताना असं वाटतं की, अजगर कोणावर तरी हल्ला करण्याच्या उद्देशानं तोंड उघडतोय; पण तसे नाही तो जांभई देत आहे. हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे नेटिझन्सनाही ते पाहून धक्काच बसला.

अजगराचा हा व्हिडीओ @lauraisabelaleon नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले, तर अनेकांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, अरे देवा… अजगरही जांभई देतात. दुसऱ्याने म्हटले, मीही पहिल्यांदाच असे काहीतरी पाहत आहे. तर, अनेकांनी हा एआय जनरेटेड व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते, अजगर अनेकदा एखादा मोठा प्राणी गिळल्यानंतर जबड्याचे अलाइनमेंट ठीक करण्यासाठी असे करतात की, जे लोकांना ‘जांभई’ देतात, असे वाटू शकते.