Viral video: शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहिरी व बोअरवेल खोदले जातात.आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे. मात्र एकदा का जर पाणी लागलं की मग शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही. तर दुसरीकडे काही शेतकरी शेततळंही बांधतात.

शेतजमिनीच्या वरच्या बाजूला पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकाला उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय. या तळ्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता,या शेतकऱ्यानं तब्बल पाच एकरात शेततळं बांधलं आहे.

प्रत्येकवेळी सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाइी शेततळे तयार करून पाणी साठवता येते. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकाला ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला ध्अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर shetkari.karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.