Viral video: जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत.यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात अनेक शेतकरी रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधून काढला आहे. ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल.

आता तुम्ही म्हणाल असा काय जुगाड केलाय या शेतकऱ्यानं? तर या शेतकऱ्यानं मध्यरात्री शेतात मोठ मोठ्यानं ताशा वाजवला आहे. या ताशाचा आवाज असा काही सगळीकडे घुमतोय की एखादा माणूसही ऐकू पळून जाईल. तसेच हा आवाज ऐकून डुक्कर घाबरून अजिबात शेतात येणार नाही.  शेतकऱ्यांच्या शेतात आता धानपीक डौलाने उभे असते. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता चांगले पीक येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगले पीक येईल या आशेने शेतात खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या रानडुकरे शेतात घुसून धानाच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. यावरच शेतकऱ्यानं एक जबरदस्त जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय.

पाहा व्हिडीओ

शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून पिकं उभी करतात आणि डुक्करांसारखे प्राणी येऊन ही सगळी मेहनत उध्वस्त करतात. शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात, अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ krishna_patil_0352 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेतकऱ्याचा नाद खुळा”, तर आणखी एकानं म्हंटलंय की, “शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig watch funny video srk