Viral video: सोशल मीडियावर सातत्याने विविध प्रकाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. प्रत्येक गावात शेतीच्या बांधावरून नेहमीच भांडणं होत असतात. जमिनीवरून होणारं हे भांडण काही वेळेस खूप गंभीर वळण घेतं आणि प्रकरण पार हाणामारीपर्यंत जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बांधावरून होणाऱ्या वादामुळे शेतकऱ्यांचा निम्मा वेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टाचे हेलपाटे मारण्यात जातो, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ब्रिटिशांच्या काळात झालेल्या बांधाचे पिढ्या वाढतील तसे आडवे-उभे तुकडे पडत गेले. पिढ्या वाढतील तसे आडवे-उभे तुकडे पडत गेले.
जमीन तेवढीच राहिली; मात्र पिढ्यांमधून माणसांची संख्या वाढत गेल्याने या जमिनींचे तुकडे पडत गेले आणि त्याच्या जोडीला भाऊबंदकीचा शाप जमिनीसोबत माणसातही विषारी फूट पाडू लागला. त्यातूनच बांधाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान, शेतातील बांधावरच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जमिनीचा वाद टोकाला गेला
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेताच्या बांधावर दोन गटांत भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. यावेळी वाद टोकाला गेला आणि दोन्ही गट ट्रॅक्टर एकमेकांच्या अंगावर घालू लागले. त्यामध्ये दोन ट्रॅक्टर दिसत आहेत. या ट्रॅक्टरवर असलेले दोघेही ट्रॅक्टर एकमेकांच्या ट्रॅक्टरवर धडकवत आहेत. शेवटी एका ट्रॅक्टरचालकाने दुसऱ्या ट्रॅक्टरचालकाला जोरदार धडक दिली आणि बाजूच्या वावरात पाडलं. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. तसेच यावेळी ट्रॅक्टरमध्ये असलेली सगळी वाळू खाली पडली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आजोबा जोमात वऱ्हाडी कोमात; ‘काठी न घोंगड’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @eklaturkar नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत. व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज मिळाले आहेत.
जमिनीवरून होणारं हे भांडण काही वेळेस खूप गंभीर वळण घेतं आणि गोष्ट पार हाणामारीपर्यंत जाते. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की, त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर जागेवरूनही हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. शेजारी तर सोडा; पण सख्ख्या भावा-भावातही बांधावरून असे वाद झाल्याच्या अनेक घटना आहेत. असाच भावाभावांमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय.
© IE Online Media Services (P) Ltd