Funny video: अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते.
अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, जेव्हा मूल हट्ट करते किंवा रडते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मूल कधी कधी फोनवर व्हिडीओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांकडे त्यांचा फोन देण्यासाठी हट्ट करणारी मुलं हळूहळू मग स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागविण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा मुलं त्यांच्या हट्टाखातर खाणं-पिणंही सोडून देतात. मात्र, आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या काही मिनिटांत सुटू शकते.
एका महिलेनं मात्र या समस्येवर जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. तिनं अशी ट्रिक वापरली की तिची मुलगी आयुष्यात कधी मोबाईलला हात लावणार नाही. या महिलेनं एक भन्नाट शक्कल लढवली.मुलगी गाढ झोपलेली असताना तिच्या डोळ्यांभोवती काळा रंग लावला. जशी ती मुलगी झोपेतून उठली, तशी आपला चेहरा पाहून घाबरली. कारण तिचा चेहरा जणू एखाद्या भूतासारखा दिसत होता. चेहरा पाहून ती मुलगी रडू लागली. त्या वेळी आईनं तिला समजावलं की तू जास्त वेळ फोन वापरतेस, त्यामुळे तुझा चेहरा असा झाला आहे. जर तू फोनचा वापर कमी केलास तर तुझा चेहरा आपोआप ठीक होईल. चेहऱ्याच्या भीतीनं मुलीनं आपली चूक मान्य केली आणि यापुढे मोबाईलसाठी हट्ट करणार नाही असं आईला वचन दिलं.
पाहा व्हिडीओ
डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
“एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ सहा मिनिटे वाचन केल्याने तणाव ६८ टक्क्यांनी कमी होतो. वाचन वाढवल्याने तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. परिणामत: अशा प्रकारे मोबाईलचे व्यसनही सुटू शकते.
ससेक्स विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरो सायकॉलॉजिस्ट डेव्हिड लुईस यांनी केलेल्या २००९ च्या अभ्यासातून असेही निदर्शनास आणले आहे, “पुस्तक वाचन हे केवळ तुमची एकाग्रताच वाढवत नाही, तर तुमच्या सर्जनशीलतेलाही चालना देते.
