हल्लीची मुलं ही फारच स्मार्ट आहेत असं म्हटलं जातं. शाळकरी मुलं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात. खासकरून ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मुलं जे काही डोकं वापरतात त्याचा परिणाम खूपच विनोदी असतो. पूर्वीच्या काळात सोशल मीडिया नसल्याने अनेक गोष्टी शाळेपुरत्या मर्यादित राहत असतात. पण आता मात्र, सोशल मीडियामुळे या गोष्टी जगासमोर येतात. विद्यार्थ्यांचे हे पराक्रम पाहिल्यानंतर नेमकं हसावं की रडावं हा प्रश्न पडतो. अशाच एका विद्यार्थ्याने वर्गात सांगितलेला निबंध सध्या व्हायरल झाला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थीदशेतील जीवन फार मजेशीर असतं. अनेक विद्यार्थी इतके विचित्र असतात की ते शाळेत मस्ती करतातच अभ्यासतही त्यांची मस्ती दिसते. असाच एका विद्यार्थ्याचा मस्तीचा कारनामा समोर आला आहे. शाळेत शिक्षकाने वडिलांवर निबंध सांगण्यास सांगितला होता. तेव्हा एका विद्यार्थ्याने वडिलांच्या निबंधावर वेगळीच करामत केली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप लोकप्रिय आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे शाळेचे दिवसही आठवतील. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, वर्गात शिक्षक एका मुलाला त्याच्या वडिलांवर निबंध वाचण्यास सांगतात. हे ऐकून मूल आधी घाबरून जाते पण नंतर जेव्हा तो आपल्या वडिलांचा निबंध सांगू लागतो तेव्हा सगळा वर्ग जोरात हसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

(हे ही वाचा : बैल बनला नवरदेव अन् गाय बनली नवरी, महाराष्ट्रातून थाटामाटात निघाली वरात; अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा )

मुलाने वडिलांवर वाचला निबंध

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. मग शिक्षक येतात आणि एका मुलाला उभे राहून त्याच्या वडिलांवर एक निबंध वाचायला सांगतात. शिक्षकाचे बोलणे ऐकताच मुलगा घाबरुन जातो. मुलाच्या शेजारी बसलेल्या त्याच्या मित्राने याबद्दल विचारल्यावर तो मुलगा सांगतो की, तो निबंध वडिलांवर नाही तर मित्रावर पाठ करुन आला आहे. यावर त्याचा हुशार मित्र म्हणाला की, एक काम कर आणि जो निबंध पाठ केलाय त्या निबंधात मित्राऐवजी वडील म्हण. हे ऐकताच तो मुलगा चेहऱ्यावर हसू आणून असचं करतो असे म्हणतो.

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा

यानंतर मुलगा आपल्या वडिलांचा निबंध सांगू लागतो. त्याने निबंधाची पहिली ओळ वाचताच संपूर्ण वर्ग हसू लागतो. यानंतर मुलगा आपला निबंध सुरू ठेवतो. या मुलाचा निबंध ऐकून मास्टरला चक्कर येऊ लागते. हा व्हिडिओ ‘मेरा बाप कौन है’ या वेब सीरिजची क्लिप आहे. जो सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. @dramebaazchhori99 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video you wont be able to stop laughing after hearing what a student said while explaining his essay on his father pdb