मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वरमध्ये गाय आणि बैलाचा अनोखा विवाह आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांतील भारवाड समाज आणि मालधारी समाजाच्या हजारो समाज बांधवांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या लग्नात बैलाला वर म्हणून सजवण्यात आले होते तर गायीला नवरीसारखं. डीजे बँडच्या तालावर नाचत, नववधू झालेल्या गायीचे लग्न करण्यासाठी लग्नाचे पाहुणे म्हणून सजलेले हजारो लोक महेश्वरमध्ये दाखल झाले. गावकऱ्यांनी या लग्नाला ‘शिव विवाह’ असे नाव दिले. शिवाच्या लग्नात वधू गाय माता नंदिनी आणि वर नंदी नंदकिशोर आपल्या वधूला घेण्यासाठी पोहोचले. वधू नंदिनी, महेश्वर (मप्र) येथील गाय आणि महाराष्ट्रातील दैवद गावातील नवरदेव नंदीचे वय १२ महिने आहे.
(हे ही वाचा : Tiger Video: पिशवी घेऊन चालत असताना व्यक्तीसमोर अचानक आला भयंकर वाघ अन् क्षणात घडलं… )
महाराष्ट्राचे रहिवासी राणा भगत म्हणाले, बैल-गायीचे लग्न करण्याची कल्पना मला सुचली. गुजरातमधून महाराष्ट्रात आल्यावर महेश्वरमध्ये विधी करू असे मला वाटले आणि मग गाय आणि बैलाचे लग्न करायचे ठरवले, कारण जुने ऋषी जे महात्मा होते ते गायी आणि बैलाचे लग्न करायचे. बैल आणि गाय यांचा विवाह शिवविवाह मानला जातो. अहिल्या मातेची नगरी महेश्वर आणि नर्मदा नदीच्या काठावर गायी-बैलांचे लग्न पार पडले. यामध्ये सर्व समाजातील लोक सहभागी झालेत. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. गायी-बैलाचे लग्न अगदी विधीपूर्वक पार पडले.