सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एवढा मजेदार आहे की, तो पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल. तुमच्या मनोरंजनामध्ये भर घालणाऱ्या या भन्नाट व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं आहे ते जाणून घेऊया. आजकाल सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमुळे लोकांचे मनोरंजन देखील होत असते. असाच एक तुमचे मनोरंजन करणारा लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये नुकतेच लग्न झालेल्या नवरदेवाने एका अतिउत्साही पाहुण्याच्या तोंडावर मुक्का मारल्याचं दिसतं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नानंतर नवरा-नवरी केक कापण्यासाठी उभे राहिलेले असताना, लग्नामध्ये आलेला एक अतिउत्साही आणि नशेत असणारा पाहुणा नवरदेव केक कापत असताना मध्येच घुसतो आणि नवरदेवासह नवरीच्या तोंडाला केक लावण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, तो ज्या पद्धतीने त्या नवदाम्पत्याला केक लावण्याचा प्रयत्न करतोय त्याचा किळस नवरदेवाला येतोय, ते सरळ सरळ व्हिडीओमध्ये दिसतं आहे. तरी देखील हा पाहुणा थांबण्याचं नावच घेत नाही, उलट तो केक लावून झाल्यानंतर नवरा-नवरीला केक फेकून मारायला सुरुवात करतो.
त्याच्या याच कृत्याचा राग आलेला नवरदेव पाहुण्याच्या चेहऱ्यावर जोरात मुक्का मारतो. त्यामुळे पाहुणा जमीनीवर कोसळतो आणि भर कार्यक्रमात सर्वांसमोर या अतिउत्साही महाशयांची बेअब्रू होते. दरम्यान, खाली पडलेला तो व्यक्ती पुन्हा उठून नवरदेवाला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी काही लोक मध्यस्ती करतात आणि त्या नशेत असणाऱ्या पाहुण्याला नवरदेवापासून लांब घेऊन जातायत.
आणखी पाहा- Video: लगट करणं पडलं महाग! महिलेचा डान्स बघून बेभान तरुण स्टेजवर चढला; तिने कंबरेवर उचललं अन पार…
त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अतिउत्साहीपणा करणं योग्य नाही अन्यथा मार खावा लागतो अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत. शिवाय या घटनेचा व्हिडीओ मजेशीर आणि कॉमेडी असल्याचं देखील अनेकजण म्हणत आहेत. हा व्हिडीओ ‘व्हायरल फाईट व्हिडीओज डेली’ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून ‘लग्नातील लढाई’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. कारण जवळपास ४३ हजार व्यक्तींनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.