Viral Video Today: अलीकडे लोककला, पारंपरिक नृत्याच्या नावाने अनेक ठिकाणी आक्षेपार्ह्य डान्स शोचे आयोजन केले जाते, यात सादरीकरण करणाऱ्या महिला अनेकदा विचित्र हावभाव व हातवारे करून नाचताना दिसतात, अलीकडे व्हायरल झालेली गौतमी पाटील याचे उदाहरण आहे. या महिलांना दोष दिला जात असला तरी इथे उपस्थित प्रेक्षकांनाही अनेकदा आपण काय करत आहोत याचे भान राहत नाही. स्टेजवर डान्स करणाऱ्या महिलांसह जाऊन नाचण्यापर्यंत काही जणांची मजल जाते खरंतर या महिला नृत्यांगनाही या अतिउत्साही हौशी प्रेक्षकांना वैतागतात पण काम आहे असे म्हणून त्या तक्रार करणे टाळतात. यातील एका महिलेने मात्र अशाच बेभान प्रेक्षकाला चांगलीच वेसण घातली आहे. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये दोन राजस्थानी पेहरावातील डान्सर महिला स्टेजवर दिसत आहेत, यावेळी काही पुरुष प्रेक्षक हे स्टेजवर चढून त्या महिलांसह नाचण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला या महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण काही वेळाने त्या प्रेक्षकाचा उत्साहाला पारावरच राहत नाही. मग शेवटी यातील एक महिला डान्सर चक्क त्या पुरुषाला कळशीसारखं कंबरेवर उचलते आणि गरागरा फिरवू लागते. या माणसाला पार चक्कर येईपर्यंत ही महिला गोल गिरक्या मारते.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
ग्रामविकासाची कहाणी
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध

हा व्हिडीओ संपताना आपण पाहू शकता महिलेच्या या कृतीने त्या उत्साही प्रेक्षकाला चांगला धडा मिळाला, त्याला स्वतःच्या पायावर धड उभेही राहता येत नव्हते शेवटी त्याचे काही मित्र येऊन त्याला घेऊन जातात.

महिला डान्सरने हौशी प्रेक्षकाला शिकवला धडा

गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा

दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत ६६ हजरांहून अधिक जणांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देताना अशा बेभान प्रेक्षकांना अशीच समज द्यायला हवी असे म्हंटले आहे. जर आपण असे नृत्याचे कार्यक्रम आयोजित करत आहात तर निदान त्या महिलांच्या सुरक्षेची तरी खबरदारी घ्यायला हवी असेही अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे.