Gautami Patil Clothes Changing Viral Video: काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. एका अज्ञात तरुणाने गौतमी पाटील कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. यानंतर आरोपीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिसांनी आता एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. आरोपी तरुण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहे. कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर गौतमी पाटीलने पहिली प्रतिक्रिया दिली.

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, “एकजण तरी सापडला ही चांगली गोष्ट आहे. पण अजून बरेचजण आरोपी आहेत, तेही लवकरात लवकर सापडतील. आरोपीला अटक झाली, ही बातमी माझ्यासाठी खूप चांगली आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा मी खूप तणावात होते. तेव्हाचा काळ माझ्यासाठी वाईट होता. आता मला छान वाटतंय.”

हेही वाचा- गौतमी पाटीलच्या वादात अजित पवारांची एन्ट्री; थेट इशारा देत म्हणाले, “अश्लील प्रकार…”

याव्यतिरिक्त गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत माहिती देताना गौतमी पाटील म्हणाली, “मी अभिनय केलेला चित्रपट कलाकारांवर आधारीत आहे. या चित्रपटाचं नाव घुंगरू आहे. त्यामध्ये मी ‘अंतरा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा आणि चित्रपटाचा आनंद घ्यावा.”

गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरण काय? (Gautami Patil Viral Video)

२४ फेब्रुवारीला पुण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ कोणीतरी शूट करून व्हायरल केला. हा व्हिडीओ गौतमीपर्यंत पोहोचताच मग तिच्याच ग्रुपमधील एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

हेही वाचा- आधी तरुणांनी धुडगूस घातला मग गावातल्या महिलांनी काठ्या घेऊन…; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ

गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची कानउघडणी केली होती. “तुमचं काही जात नाही पण मला लोकं बोलतात, तुमच्याही घरी, आई- बहिणी असतील ना, मग हे असं काम करताना त्यांचा विचार मनात आला नाही का?” असा प्रश्न गौतमीने केला होता. शिवाय हा व्हिडीओ आपण सर्वात आधी आपल्या आईला पाठवून तिला कल्पना दिली होती, हे म्हणताना गौतमीचे डोळे पाणावले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil first reaction accused arrested who shoot gautami patil clothes changing viral video rmm