15-Feet Python Viral Video: रात्रीचा काळोख, शांत रस्ता आणि अचानक समोर उभं राहतं एक प्रचंड धूड… गाड्यांच्या हेडलाईटमध्ये चमकणारी त्याची लांबलचक काया पाहून प्रत्येकाचा श्वास अडकतो. हा एखाद्या चित्रपटातील सीन नाही, तर खरा व्हिडीओ आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने पसरतोय. एवढा मोठा अजगर खरोखर अस्तित्वात आहे का की ही फक्त कॅमेऱ्याची करामत? नेमका कुठे दिसला हा १५ फुटांहूनही लांब अजगर? त्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही अवाक् व्हायला होईल…
सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, की तो पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. हा साधा अजगर नाही, तर त्याची लांबी तब्बल १५ फुटांहूनही लांब आहे. हा अजगर रस्त्यावरून निवांतपणे पुढे सरकताना दिसतो. रात्रीच्या काळोखात गाड्यांच्या हेडलाईटमध्ये त्याचे भव्य रूप दिसताच लोक थक्क होऊन गेले.
एवढा मोठा अजगर खरोखर असतो का?
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, अजगर अगदी संथपणे रस्ता ओलांडत आहे. त्याची लांबी इतकी मोठी आहे की काही क्षणांसाठी संपूर्ण रस्ता जणू त्याच्या शरीराने व्यापून टाकलाय. त्याला पाहिल्यावर गाड्यांची इंजिने थांबली, लोकांनी मोबाईल काढून चित्रीकरण सुरू केले आणि वातावरणात भीतीसोबत प्रचंड कुतूहल पसरले. हेडलाईटच्या प्रकाशात चमकणारी त्याची कातडी पाहून कुणाच्याही अंगावर काटा आला नसता तरच नवल!
हा व्हिडीओ नक्की कुठला?
सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, हा व्हिडीओ उत्तराखंडची राजधानी डेहराडूनचा आहे; पण अद्याप त्याची अधिकृत खात्री झालेली नाही. काही वृत्तसंस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, ते या व्हिडीओच्या सत्यतेची हमी देऊ शकत नाहीत. म्हणजेच अजगर खरोखर डेहराडूनमध्ये दिसला की कुठल्या दुसऱ्याच भागात, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!
हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स अक्षरशः थक्क झालेत. कुणी याला “नेशनल जिओग्राफिकची लाईव्ह सीन” म्हटलं; तर काहींनी भीती व्यक्त केली. काही मजेशीर प्रतिक्रिया देत म्हणाले, “डेहराडून ट्रिपचा प्लॅन आता रद्द करावा लागेल बहुतेक!”
जंगलात अजगर दिसणं नवल नाही; पण रस्त्यावर…?
डोंगराळ व जंगल परिसरात अजगर दिसणं नवीन नाही; पण अशा गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या मध्यभागी एवढा मोठा अजगर निवांतपणे फिरताना दिसणं ही खरी धक्कादायक बाब आहे. त्यामुळे व्हिडीओ कुठलाही असो; पण इंटरनेटवर त्यानं खळबळ माजवली आहे हे मात्र नक्की.
हा अजगर खरोखर डेहराडूनमध्येच दिसला का? की हा कुठल्या दुसऱ्या ठिकाणचा व्हिडीओ आहे? याचं उत्तर अजूनही गूढच आहे.