Viral video: सोशल मीडियावर क्षणा क्षणाला असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांच लक्ष वेधन्यात यशस्वी होतात. त्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात. सध्या सोशल मीडियावर ऑफिसमध्ये तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ एक ऑफिसमधील असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये डान्स करत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या तरुणीचे ठुमके राहिले बाजूला, या व्हिडीओत तिच्या मागे बसलेल्या एका तरुणाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. आता का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ऑफिसचा हा व्हिडीओ आहे. ज्यात दिवे आणि डेकोरेशन केलेलं दिसतं आहे. यावरून ऑफिसमधील दिवाळी पार्टीचा हा व्हिडीओ असावा. कर्मचारीही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे. एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी डान्स करत आहे.

माधुरी दीक्षितचं ‘आजा नाच ले, नाच ले, मेरे यार तू नाच ले’ हे गाणं ऐकायला येतं आणि मुलगी त्यावर ठुमके लगावते. तेव्हा तिच्यासमोर असलेले सगळे जण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. तिच्या किलर डान्स मूव्हज, एक्सप्रेशन आणि ग्रेस कमाल आहे. पण नंतर कॅमेरा तिच्याच मागे बसलेल्या लाल कुर्ता घातलेल्या एका तरुणाकडे जातो. लॅपटॉपसमोर बसलेला हा तरुण नाचणाऱ्या मुलीपेक्षा अधिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.ऑफिसमधील सगळे नाचण्यात, गाण्यात आणि उत्सवात मग्न असताना, हा तरुण मात्र त्याच्या लॅपटॉपवर काम करण्यात बिझी होता. लोकांना हे दृश्य इतकं मजेदार वाटलं की आता सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sparkling_osheen नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, प्रत्येक ऑफिसमध्ये असा एकजण असतोच, तर अनेकांनी तरुणीच्या डान्सचं तोंड भरून कौतुक केलंय.