वडील आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. वडीलांचा आपल्या मुलीवर जास्त जीव असतो. प्रत्येक वडीलांना आपली मुलगी राजकुमारी वाटते त्यामुळे ते आपल्या लाडक्या लेकीला अगदी फुलांसारखे जपतात, तिचे सर्व हट्ट पूर्ण करतात आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्या लेकीसाठी कोणतेही वडील काहीही करायला तयार असतो. लेकीच्या चेहर्‍यावरील हसू पाहण्यासाठी कोणतेही गोष्ट करण्यासाठी मागे वडील पुढे पाहात नाही. सध्या अशाच वडील आणि लेकीच्या सुंदर नात्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिल कुटुबांसाठी किती कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात. वडीलांच्या कष्टाची जाण ही सर्वात जास्त लेकीला असते. हेच या व्हिडीओमधून दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कामावरून थकून घरी आलेल्या वडीलांचे लेकीने हटके पद्धतीने स्वागत केले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीने काम करून थकलेल्या वडिलांचे घरात येताच हटके पद्धतीने स्वागत केले आहे. वडीलांचे स्वागत करण्यासाठी तिने जे ते पाहून इंटरनेटवर नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. लवीरा लावीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तिचे वडील कामावरून थकून घरी आल्यानंतर त्यांच्या स्वागातासाठी पॉप गायक जस्टिन बीबरच्या हिट ट्रॅक ‘बेबी’ गाणे लावून डान्स केला आहे. घरात येताच मुलगी डान्स करून लागली हे पाहून वडीलांनी जी प्रतिक्रिया दिली त्याने अनेकांचे मन जिंकले आहे.

हृदयस्पर्शी व्हिडीओमध्ये तिचे वडील घरात येताच लवीरा नाचताना दिसते. वडील तिच्यावर रागवल नाहीतर उलट तिच्याबरोबर तेही नाचू लागले. वडीलांच्या चेहऱ्यावरही तिच्या इतकाच उत्साह आणि आनंद दिसत आहे. व्हिडीओ पाहून तेही लाडक्या लेकीबरोबर आनंदाने नाचत आहे. दोघांना एकमेकांचा हात पकडून नाचताना पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि चेहऱ्यावर हसू देखील उमटले.

व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला, ६ लाखांपेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले की,” “पीओव्ही – तुमचे वडील कामावरून आले आणि तूम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी एका मजेदार डान्स करून त्यांना आश्चर्यचकित केले.

/

व्हिडीओ येथे पाहा

ऑनलाइन प्रेक्षकांना या सुंदर जोडीची झलक पाहायला मिळाली नाही. अनेक वापरकर्त्यांनी वडिलांच्या उत्साहाचे आणि मुलीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

“कल्पना करा की कामावरून थकून परत येत असतानाही तुम्ही तुमच्या मुलीच्या उर्जेशी जुळवून घेत आहात,” असे एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “बाबा त्यांच्या मुलीचे हास्य पाहताच सर्व ताण आणि वेदना विसरतात.”

“प्रत्येक मुलीसाठी वडिलांनी दिलेला प्रतिसाद हा एक स्वप्न आहे, ही मुलगी भाग्यवान आहे,” अशी कमेंट एकाने केली.

काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये इतके प्रेम आहे ते पाहून लक्षात येते की,वडील-मुलीचे नाते सर्वात सुंदर का असते.