Funny video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणीला भर बाजारात रीलवर नाचताना पाहून आईनं चांगलाच चोप दिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. टीव्ही, कॉम्प्युटर आणि फोन या सर्व सुविधा एकाच माध्यमातून देणारा स्मार्ट फोन आणि आपले अगदी जीवाभावाचे मैत्र झाले आहे. सोशल मीडियाने तर काहींचं संपूर्ण जगणंच व्यापलं आहे. त्यात आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. अशाच एका तरुणीला भर गर्दीत विचित्र डान्स करुन रील बनवताना आईनं पाहिलं आणि सगळ्यांसमोर तिला मारलं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलवार ड्रेस घातलेली एक मुलगी गर्दीसमोर नाचत आहे. अनेक लोक त्यांच्या फोनमध्ये तिचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. यात मुलगी बेधुंद होऊन नाचताना दिसते. मात्र पुढच्याच क्षणी मुलगी नाचण्यात मग्न असतानाच मागून तिची आई येते आणि आपल्या मुलीचा हा सर्व प्रकार पाहून ती भडकते.

आपल्या मुलीला लोकांसमोर नाचताना पाहून तिची आई लगेच तिच्याजवळ जात तिला मारहाण करण्यासाठी तिच्या जवळ जाते. यानंतर आईच्या तावडीतून पळ काढत ही तरुणी तिथून निघून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Ghar Ke Kalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं, याला म्हणतात आईचा धाक तर आणखी एकानं आई आईच असते अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl dancing in front of the crowd mother came and started beating her badly funny video goes viral on social media srk