आजकाल मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा खूपच वाढत चालल्या आहेत, असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांनी अनेक तरुणांना घाम फोडला.अनेकदा मुलींना विचारलं जातं काय गं तुला कसा मुलगा हवा आहे. यावर ती तिच्या सगळ्या अपेक्षा सांगून टाकते, अगदी दिसण्यापासून काय काय असायला हवं इथपर्यंतची यादी तयारच असते. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणीला तुला रामासारखा नवरा हवा की रावणासारखा असं विचारलं असतं तिने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हीही चकीत व्हाल.

नवरा कसा हवा राम की रावणासारखा?

कारण या तरुणीला चक्क रावणासारखा मुलगा हवा आहे अशी तीची अपेक्षा आहे. मात्र यामागे काय कारण आहे ? हे तिच्याकडूनच ऐका..यामगचं कारण तिने पुढे सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी तीन मुलींजवळ जाते आणि त्यांना विचारते तुला कसा नवरा हवा आहे, रामासारखा की रावणासारखा. यावर ती उत्तर देते मला रावणासारखा नवरा हवा आहे. कारण, प्रत्येक महिलेला आपली काळजी घेणारा, आपल्याला आनंदी ठेवणारा, आपला आदर करणारा आणि आपल्या पाठिशी कायम उभा असणारा नवरा हवा असतो.

“कारण रावणाचं सीतेवर प्रेम होतं. रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं. पण तिला हात न लावता तो सोबत घेऊन गेला. इतके दिवस सीता त्याच्यासोबत होत्या. तरीही रावणाने तिच्याशी गैरवर्तन केलं नाही. आता पाहिलं तर पुरुषांनी त्यांच्या बायकोवर समाजावर थोडं वर्चस्व गाजवायला हवं. त्यामुळे या कलियुगातील माझा जोडीदार हा रावणासारखा असावा असं मला वाटतं.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यूनंतरही यातना! रुग्णवाहिका नसल्यानं भावानं बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून नेला; ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Suchitra_Dass या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.