सोशल मीडियावर रोज प्राण्यांचे व्हिडीओव्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ अतिशय विनोदी असतात तर काही शिकवण देणारे असतात. असाच एक हत्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्ती हा एक बुद्धिमान प्राणी मानला जातो. त्याची स्मरणशक्तीही जास्त असते. दरम्यान सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हत्तीचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. या कळपातील शेवटच्या हत्तीने जे केलं ते पाहून नेटीझन्स त्याचं कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीलाच दिसून येत आहे की एक हत्तीचा मोठा कळप रस्ता ओलांडत आहे. त्यांना रस्ता ओलांडून देण्यासाठी एक कार वाला थांबतो. याच कार चालकाने हा व्हिडीओही शूट केला आहे. संपूर्ण कळपाने रस्ता ओलांडल्यावर शेवटचा हत्ती आपली सोंड वर करून त्या कार चालकाचे आभार मानतो. हत्तीची कृतज्ञता दर्शवणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

( हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

(हे ही वाचा: वा!! हरणाने मारलेला गोल आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन पाहून तुम्हीही व्हाल फॅन; पाहा viral video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आय एफ एस (IFS) ऑफिसर सुधा रामेन यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळ जवळ ४०० हजार लोकांनी बघितलं आहे. आणि २३ हजाराहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे. नेटीझन्सने व्हिडीओवर कमेंट्स करत हत्तीचं कौतुक केलं आहे.

(हे ही वाचा:जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ ?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gratitude elephant say thanks to the in a unique way for stopping the car to cross the road video viral ttg