Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येतं.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. शुभ प्रसंगी आवडीने उखाणा घेतला जातो. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात. सध्या असाच एक नवरदेवाचा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा सुरू आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभातील आहे. या व्हिडीओत नवरदेवाला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो पण त्याला उखाणा घेता येत नाही तेव्हा समोरुन एक तरुण येतो आणि नवरदेवाला कानात उखाणा सांगतो. नवरदेव उखाणा ऐकताच हसायला लागतो. त्याला नवरीसह सर्वजण उखाणा घेण्यासाठी आग्रह करतात तेव्हा भीत भीत उखाणा घेतो.
उखाणा घेताना तो म्हणतो, “हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर.. माझी बायको जाम चाप्टर” हा उखाणा ऐकून सर्व जण जोरजोराने हसायला लागतात. बाजूला असलेली नवरीसुद्धा उखाणा ऐकून अवाक् होते. त्यानंतर ती म्हणते मिश्कीलपणे म्हणते, “मी आता उखाणा घेत नाही” हा मजेशीर उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : “… आता मला बॉयफ्रेंड नको, डायरेक्ट नवराच हवा”; अविवाहित तरुणीने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

marathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “भाऊ आता तुझं काही खरं नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान भावा” काही युजर्सनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.