सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे महेंद्रा अ‍ॅण्ड महेंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा. आनंद महिद्रांच्या नावाखालोखालच प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांचंही नाव सोशल नेटवर्किंगमुळे कायम चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये घेतलं जातं. अगदी रोज घडणाऱ्या घडामोडींपासून ते जुने संदर्भ आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मोकळेपणे मतं व्यक्त करणारे हर्ष गोयंका हे सोशल नेटवर्किंगवर प्रचंड लोकप्रिय आहेत. ते अनेकदा जुने फोटो, काही किस्से किंवा मजेदार व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रसिद्ध उद्योजक आणि त्यावेळी टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा असणाऱ्या जे. आर. डी. टाटा यांना लिहिलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोयंका यांनी हे पत्र शेअर करताना, “अती शक्तीशाली पंतप्रधान आणि फार मोठ्या उद्योजकांमधील फार खासगी पत्र. हे पत्र फारच उत्तम आहे,” अशी कॅप्शन दिलीय. फोटोत दिसणार पत्र हे ५ जुलै १९७३ रोजी लिहिण्यात आलं आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे पत्र प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना लिहिलं होतं.

तुम्ही दिलेला पर्फ्यूम मला फार आवडला. त्यासाठी तुमचे खूप सारे आभार. मी सामान्यपणे पर्फ्यूम वापरत नाही. मी सामान्य जगापासून एवढी भविक्त असते की मी हे असं काही वापरत नाही. पण यापुढे मी नक्कीच यासंदर्भात प्रयोग करत जाईन, असं इंदिरा यांनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

पत्राच्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्या कामाबद्दल जे. आर. डी यांना जे काही सकारात्मक, नकारात्मक वाटतं ते मनमोकळेपणे सांगत जावे असं म्हटलं आहे. पत्रात त्या म्हणतात, “तुम्हाला भेटून फार आनंद झाला. तुम्हाला जेव्हा केव्हा काही सल्ला द्यावासा वाटेल, लिहून कळवावेसे वाटेल किंवा भेट घ्यावीशी वाचेल तेव्हा निश्चिंतपणे तुम्ही येऊ शकता. तुम्ही तुमची मत मग ती सकारात्मक असो किंवा टीका करणारी असो ती संकोच न करता मांडू शाकता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचीच इंदिरा गांधी,”

यावर लोकांनी अनेक रिप्लाय दिले आहेत. आज तुम्ही सरकारला नकारात्मक मत सांगू शकत नाही असं अनेकांनी कमेंटमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षपणे लिहिल्याचं या फोटोखालील कमेंटमध्ये दिसत आहे. आज तुम्ही पंतप्रधान कार्यालायाल नकारात्मक लिहून दाखवाच, असं चॅलेंज एकाने कमेंटमध्ये दिलं आहे. तर तो काळच वेगळा होता, तेव्हाचे नेते आणि उद्योजक हे सक्षम भारतासाठी काम करत होते. आज तुम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे टीका करणारं काहीतरी पाठवून बघा, हे आणि असे अनेक रिप्लाय यामध्ये आहेत. पाहूयात काही रिप्लाय…

१) सध्या आपण असा काळात जगतोय जिथे…

२) तो काळच वेगळा होता…

३) आज तुम्ही पंतप्रधान कार्यालायाल नकारात्मक लिहून दाखवाच

४) त्या उत्तम नेत्या होत्या…

५) जे. आर. डी फार छान लिहायचे

एकंदरितच या कमेंट्सवरुन लोकांनी काही दशकांपूर्वीच्या या पत्राचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी जोडल्याचं चित्र दिसून येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harsh goenka shared old letter written by then prime minister indira gandhi to a giant industrialist j r d tata scsg