सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक गाणं तुफान ट्रेंड होत आहे. जिथे बघाव तिथे हेच गाणे तुम्हाला पहायाला ऐकायला मिळेल. अनेक तरुणी ‘गुलाबी साडी’ नेसून या गाण्यावर नाचताना दिसत आहे. ‘गुलाबी साडी’ ऐकताच तुमच्या लक्षात आले असेलच आम्ही कोणत्या गाण्या बद्दल सांगत आहोत. होय तुमचा अंदाज बरोबर आहे. गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये धुमाकूळ घातला आहे. न्युयार्क टाईम्सच्या स्क्वेअरवर झळकणारे हे पहिले मराठी गीत संजू राठोडने लिहिलं आहे. ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ असे या गाण्याचे बोल आहेत. सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या या गाण्याचं हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहा.

सोशल मीडियाव चर्चेत आलेल्या अशा प्रकारच्या अनेक हिंदी गाण्यांचे मराठी व्हर्जन झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण आता चक्क गुलाबी साडी या प्रसिद्ध मराठी गाण्यांचे हिंदी व्हर्जनही तयार करण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर jasraunaksinghmusic नावाच्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जसरौनक सिंग हा एक गायक आहे. प्रसिद्ध गाण्यांचे मॅशअप, रिप्लाय व्हर्जन, लव्ह सॉन्ग व्हर्जन, हिंदी व्हर्जन तयार करून आपल्या आवाजात गाताना व्हिडीओ पोस्ट करतो.

हेही वाचा –“जो चल नहीं सकता, वो उड़ सकता है बस….”, बंजी जंपिग करत दिव्यांग तरुणानं दाखवलं धाडस, Viral Video बघाच

सध्या या तरुणाने गुलाबी साडी या प्रसिद्ध मराठी गाण्याचे हिंदी व्हर्जन करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचे पहिले कडवे त्याने हिंदीमध्ये गायले आहे.”सजा है काजल मेरी आंखों में आज, ऐसे तो ना देखो मुझे, रखो थोड़ी लाज, हुई तैयार, हुआ सोला श्रृंगार, तू है मेरा राज, तेरी अप्सरा मैं खास……ए नकरे वाली, कौन तू जा रही? पहन साड़ी लाल-गुलाबी…पागल करती तेरी मोरनी सी चाल…गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” असे या हिंदी गाण्याचे बोल आहे. मराठी गाण्याची मुख्य ओळ मात्र मराठीत ठेवली आहे.

हेही वाचा – ‘फक्त पापड नव्हे, राजस्थानच्या तापलेल्या वाळूत अंडही निघालं उकडून!’, बीएसएफ जवानाचा नवा Video Viral

जसरौनकचा आवाजात हे गुलाबी साडी गाण्याचं हिंदी व्हर्जन आणखीच खुललं आहे. ‘गुलाबी साडी’गाण्याचं हिंदी व्हर्जन लोकांना प्रचंड आवडले आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओल ४ लाखोंपेक्षा जास्त वेळा पाहिले आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. गुलाबी साडीचं हिंदी व्हर्जन ऐकल्यानंतर एकाने लिहिले, “आज मराठी गाण्याचा खरा अर्थ कळला”अनेकांनी मराठी गाणेचे उत्तम आहे” असे म्हटले.